Wednesday, December 30, 2009

वाढदिवस

वाढदिवस ही एक चांगली गोष्ट आहे. ज्या व्यक्तीचे जास्त वाढ दिवस साजरे होतात, ती व्यक्ती जास्त दिवस जगते, हे गणिताने सिद्ध करता येते.

जन्म

माझा जन्म झाला तेव्हा एवढा मोठा धक्का बसला की, जवळपास दीड वर्षं मी एक शब्दही बोलू शकलो नाही.

विनाकारण वाद

सासू-सुनेचा जोरदार वाद चालला होता. कोणताही पक्ष मागे हटण्यास तयार नव्हता. सासरेबुवा वर्तमानपत्रात डोके खुपसून बसले होते. वैतागलेल्या मधूने पत्नीला बाजूला घेऊन सांगितले. ‘हे बघ, उगाच वाद वाढवू नकोस, आई अजून फार तर एक-दोन वर्षांत आटपेल, कशाला वाईटपणा घेतेस.’ थोडय़ा वेळाने मधूने आईला सांगितले, ‘आई, तुझे आता वय झाले आहे. विनाकारण वाद घातला नाहीस तर आणखी पंधरा-वीस वर्षे आरामात जगशील’ सासू-सुनेचे वाद नंतर कधीही झाले नाहीत.

Friday, December 18, 2009

देवदूत

एक गृहस्थ रस्त्यातून चालत असताना आवाज आला. ‘थांब पुढे पाऊल टाकू नकोस, वीट तुझ्या अंगावर पडेल. तो थांबला आणि खरोखरच एक वीट त्याच्या पुढय़ात पडली. तो रस्ता ओलांडत असताना पुन्हा आवाज आला. थांब एकाच जागी उभा राहा तू हललास तर मोटार तुझ्या अंगावरून जाईल. तो पटकन स्तब्ध उभा राहिला आणि त्याचक्षणी एक गाडी वेगाने त्याला चाटून गेली न राहवून त्या गृहस्थाने विचारले सांग तू कोण आहेस? उत्तर आले, मी देवदूत आहे आणि तुझे रक्षण करण्यासाठी आलो आहे. हताश होऊन तो गृहस्थ विचारता झाला. ‘माझे लग्न होताना तू कोठे होतास?’

Thursday, December 17, 2009

'टू कप टी'

एका मुलाचे नवीनच लग्न झाले होते. त्याला वाटले की आपली बायको शिकलेली असेल.

जेव्हा त्या मुलीचे वडील त्या मुलीला माहेराला नेण्यासाठी येतात. तेव्हा हा मुलगा आपल्या बायकोला इंग्रजीत म्हणतो,

'टू कप टी'. ती शिकेलेली नसल्यामुळे तिला वाटते, नवरा आपल्याला कपटी म्हणाला. ती म्हणाली, 'मी नाही तूच कपटी..!'

Wednesday, December 16, 2009

Earth & Moon

Teacher:Whats d relation bw Earth & Moon?
Chintu:Brother & Sister
Teacher:How?
Chintu:Earth Darthi mata n Moon Chanda Mama.

Tuesday, December 15, 2009

अपेक्षाभंग

मिस चोंबडे : काय गं, बॉसच्या केबीनमधून अशी वैतागून का बाहेर आलीस?


मिस ढोपले : आपला बॉस लबाड आहे. वाईट्ट आहे मेला.

मिस चोंबडे : का गं? काय केलं त्यांनी?

मिस ढोपले : त्यांनी विचारलं की मिस ऑफीस सुटल्यावर काय करताय आज? मी म्हटलं, इश्श्श! मी फ्री आहे ना.

मिस चोंबडे : मग?

मिस ढोपले : मग काय, म्हणाला ऑफीसनंतर थांबा आणि हे पन्नास पेपर्स टाईप करा

Monday, December 7, 2009

taqat war

CHINTU- Mai bachpan me bohat taqat war tha..
BAGALYA-wo kaise?
CHINTU-Maa kehti hy k jab mai rota tha
to sara ghar sar pe utha leta tha

RAAZ

RAAZ-Abe Tu Yaha Baitha hai
Tere Dost ki Death ho gai hai

Tu Gaya Kyu Nai?

B-Usne Mujhe Bulaya Hi Nahi

सारेगमप

एक छोटा डास त्याच्या आईला विचारतो, ‘‘मी गाण्याच्या कार्यक्रमाला जाऊ का?’’
आई : ‘‘कोणता कार्यक्रम आहे?’’
छोटा डास : ‘‘पल्लवी जोशींचा ‘सारेगमप’ कार्यक्रम.’’
आई डास : ‘‘जा; पण सांभाळून राहा. कारण तिथे लोक सारखे टाळ्या वाजवित असतात.’’

दमा

‘‘मी सांगितल्याप्रमाणे खिडक्या उघडय़ा ठेवून झोपला का?’’
‘‘हो डॉक्टर’’
‘‘मग गेला की नाही दमा?’’
‘‘दमा बराच कमी झाला; पण माझे घडय़ाळ, टी. व्ही., लॅपटॉप मात्र चोरांनी नेले.’’

Tuesday, December 1, 2009

झोप

‘‘काल तुम्ही घरी नव्हतात, नि रात्रभर मला काही झोप नाही.’’ रात्री झोपण्यापूर्वी मच्छरदाणी गादीखाली मुडपून घेता घेता ती म्हणाली.
‘‘लब्बाड, मी नसलो तर तुझी झोपसुद्धा नाहीशी होते म्हणायची!’’ तिच्या हिरव्या बांगडय़ाशी चाळा करीत तो पुटपुटला.
‘‘तर काय? तुम्ही नसल्यामुळे सगळे मेले ढेकूण मला एकटीलाच चावत होते.’’

डॉक्टर

धीर खेडेगावात आपल्या मामाकडे गेला होता. गाव पाहून झाल्यावर त्याने विचारले, ‘‘तुमच्या गावात कोणीच आजारी पडत नाही, असं ऐकलंय्, ते खरं आहे का? पण हे कसं शक्य आहे?’’
‘‘का नाही’’ मामा उत्तरले, ‘‘आमच्या गावात एकच डॉक्टर आहे. तो तिरसट आणि भांडकुदळ आहे. सर्वच गिऱ्हाईकांशी तो तुच्छतेने बोलतो. म्हणून गावकऱ्यांनी असं ठरविलंय्, उगीच आजारी पडून त्याला धंदा मिळू द्यायचा नाही, म्हणजे तो आपोआप वठणीवर येईल. म्हणून आम्ही गावातले सारे निरोगी राहतो.’’