Thursday, March 18, 2010

अदभूत नजारा

सर्कसच्या रिंगणात, एक सुंदर स्त्री एका सिंहाला त्याच्या पिंजऱ्यात जावून किस करीत होती. सर्कस पहायला गेलेले सर्व प्रेक्षक श्वास रोखून तो नजारा बघत होते. पिंजऱ्याभोवती गोल चक्कर मारता मारता रिंग मास्टरने

प्रेक्षकांना विचारले, '' बघा हा अदभूत नजारा .. तूम्ही कधी बघितला नसेल ... आणि भविष्यात कधी बघणारही नाही...''

मग अचानक प्रेक्षंकाकडे वळून रिंगमास्टर म्हणाला, '' काय प्रेक्षकातले कुणी असं करु शकते?''


प्रेक्षकातून एक सरदार उभा राहाला आणि ओरडून म्हणाला, '' हो... मी करु शकतो... पण आधी त्या मुर्ख सिंहाला पिंजऱ्याच्या बाहेर काढा''

Wednesday, March 17, 2010

काय वाटतंय

एका निर्जन ठिकाणी एक मुलगा आणि एक मुलगी वेफर्स खात बसली होती.
मुलगी- विनू, आता या क्षणी तुला काय वाटतंय रे?
मुलगा- मला असं वाटतंय की, तू माझ्यापेक्षा जास्त वेफर्स खाल्लीत!

उपवास

एक सुंदर तरुणी डॉक्टरकडे उपचारासाठी गेली.
डॉक्टर- (तपासण्यासाठी) ‘हं, तोंड उघडा पाहू!’
तरुणी- ‘इश्शऽऽ माझा तर आज उपवास आहे!’
डॉक्टर- ‘त्याचा इथे काय संबंध?’
तरुणी- ‘अहो, तुमचा ‘डोज’ मी कसा घेणार?’

Friday, March 12, 2010

कितने आदमी थे?

गब्बर- अरे ओ सांबा, कितने आदमी थे?
सांबा- मालूम नही सरदार, मै तो औरते गिन रहा था.

Monday, March 8, 2010

कॉम्प्युटर प्रोग्रॅमर

कॉम्प्युटर प्रोग्रॅमर (त्याच्या मुलाला) : हा घे मी तुला फुटबॉल आणलाय.


मुलगा : व्वाव! पण 'युजर्स गाइड' कुठाय?

Thursday, March 4, 2010

Sin x = 6n

In Exam qstn paper:-
Q). prove Sin x = 6n

Sardar: cancelling 'n' on both side..







Then six=6
LHS = RHS

Wednesday, March 3, 2010

पत्नी आणि पोलीस

पोलीस- (कार चालवणाऱ्याला थांबवून) ‘काय राव. भर चौकातून सिग्नल तोडून चाललाय?’
तो- छे हो! सिग्नल पिवळा होत असतानाच पुढे गेलो..
त्याची पत्नी- (बाजूला बसलेली) काहीतरीच काय? चांगला लाल झालेला..
त्यानं पत्नीकडं रागानं बघितलं.
पोलीस- तुमचा मागचा इंडिकेटरपण फुटलाय.
तो- अरेच्या मला माहीतच नव्हतं ते.
पत्नी- अरे, तूच तर सांगितलंस ना मला तो फुटून आठवडा झाला. पण दुरुस्तीला वेळच मिळाला नाही म्हणून!
त्यानं पुन्हा तिच्याकडे दात-ओठ खाऊन बघितलं.
पोलीस- साहेब आणि तुमचा सीट बेल्ट पण लावलेला नाहीये.
तो- आत्ताच तर तुम्ही कार थांबवतांना काढला मी तो.
पत्नी- मी तर तुला कधीच सीट बेल्ट लावलेला पाहिला नाही.
तो- (पलीकडे खाऊ की गिळू नजरेनं पाहून) बाई गं, तुझं थोबाड बंद ठेव.
पोलीस- (तिला) मॅडम, तुमचे मिस्टर असंच बोलतात नेहमी तुमच्याशी?
पत्नी- नाही हो, दारूच्या नशेत असला तरच..

व्यावसायिक

रावसाहेब आपल्या बायकोबरोबर संध्याकाळी बाजारात जातात. रस्त्याने जातांना त्यांना एक मॉडर्न बाई भेटते. त्यांच्याशी जरा सलगीने बोलते हायं, हॅलो करते आणि निघून जाते. ती निघून गेल्यावर बायको रावसाहेबांना विचारते तुमची तिच्याशी ओळख कशी?
रावसाहेब म्हणतात- व्यावसायिक! बायको जरा रागानेच पुन्हा विचारते तुमच्या बाजूने की तिच्या?