मुलाची आई (मुलीच्या आईला)- ‘‘मला तुमची मुलगी पसंत आहे हो; पण एक सांगायला हवंच हं. माझा मुलगा ना नास्तिक आहे. त्याचा देवावर अजिबात विश्वास नाही.’’
मुलीची आई- ‘‘त्याची नका चिंता करू, एकदा लग्न होऊन तो माझ्या मुलीबरोबर राहू लागला की, आठ-दहा दिवसातच त्याला सारे देव आठवू लागतील.’’
Monday, November 29, 2010
नास्तिक
Labels:
joke of the day,
laugh,
Marriage Humour,
smile
तर तू काय करशील?
आई (बारा वर्षांच्या मुलीला) तू स्वयंपाक करायला शीक, वॉशिंग मशीन सुरू करायला शीक, घरकाम तुला आले पाहिजे.
मुलगी- का?
आई- तुझा पती, समजा, आजारी पडला किंवा दौऱ्यावर गेला, तर तू काय करशील?
मुलगी- का?
आई- तुझा पती, समजा, आजारी पडला किंवा दौऱ्यावर गेला, तर तू काय करशील?
Labels:
joke of the day,
laugh,
Marriage Humour,
smile
Wednesday, November 24, 2010
रजनीकांत - THE BOSS
स्पायडरमन, सुपरमन, बॅटमन, जेम्स बॉन्ड, शक्तिमान, क्रिश हे सगळे रजनीकांतला भेटायला येतात तो दिवस कुठला?
?
?
?
?
...?
?
?
गुरु पोर्णिमा.
?
?
?
?
...?
?
?
गुरु पोर्णिमा.
Labels:
joke of the day,
laugh,
Rajanikant,
smile,
रजनीकांत - THE BOSS
बाल विवाह
गुरुजी : तुम्हाला इतिहासातलं कुठलं पात्रं अजिबात आवडलं नाही?
मुलं : राजा राम मोहन राय
गुरुजी : का बरं?...................
...
मुलं : त्यांनीच तर बाल विवाहावर बंदी आणली होती ना...
मुलं : राजा राम मोहन राय
गुरुजी : का बरं?...................
...
मुलं : त्यांनीच तर बाल विवाहावर बंदी आणली होती ना...
Labels:
joke of the day,
laugh,
Marriage Humour,
smile,
बाल विवाह
रजनीकांतचा फोन
रजनीकांतचा फोन silent mode वर असतो, त्याला कॉल येतो, फोन vibrate होतो आणि टिव्हीवर ब्रेकिंग न्यूज येते
"आज शहरात भूकंपाचे धक्के जाणवले, रिश्टर स्केल वर त्याची तीव्रता अमकी तमकी होती".....
"आज शहरात भूकंपाचे धक्के जाणवले, रिश्टर स्केल वर त्याची तीव्रता अमकी तमकी होती".....
Labels:
joke of the day,
laugh,
phone,
Rajanikant,
smile
अजब प्रेम की गजब प्रेम कहाणी
डुक्कर आणि कोंबडी एकमेकांच्या प्रेमात पडतात. एक दिवस ते दोघेजण रंगात येतात आणि एकमेकांच चुंबन घेतात.
दुसरया दिवशी डुकर मरते, "बर्ड फ्लू" मुळे.
आणि कोबडी मरते "स्वाइन् फ्लू" मुळे.
यालाच म्हणतात "अजब प्रेम की गजब प्रेम कहाणी".....
दुसरया दिवशी डुकर मरते, "बर्ड फ्लू" मुळे.
आणि कोबडी मरते "स्वाइन् फ्लू" मुळे.
यालाच म्हणतात "अजब प्रेम की गजब प्रेम कहाणी".....
Tuesday, November 23, 2010
रजनीकांत
एके दिवशी रजनीकांत मॉर्निंगवॉकला निघाला. दुपारी त्याला पोलिसांनी अटक केली.
का?
कारण चालत चालत तो पासपोर्ट-व्हिसाशिवाय अमेरिकेत पोहोचला होता.
का?
कारण चालत चालत तो पासपोर्ट-व्हिसाशिवाय अमेरिकेत पोहोचला होता.
Monday, November 22, 2010
सॉल्लिड
पोलिस : मॅडम, तुम्ही खूप बहादूर दिसताय. रात्री घरात घुसलेल्या चोराला तुम्ही काय सॉल्लिड बदडून काढलंत.
मिसेस गणपुले : बहादूर वगैरे काही नाही हो...मला काय माहित तो चोर आहे. मला वाटलं होतं की आमचे हे रात्री उशिरा घरी आले आहेत.
...............
मिसेस गणपुले : बहादूर वगैरे काही नाही हो...मला काय माहित तो चोर आहे. मला वाटलं होतं की आमचे हे रात्री उशिरा घरी आले आहेत.
...............
Labels:
joke of the day,
laugh,
Marriage Humour,
smile
मला काहीच लपवायचे नाही.
जॉर्ज बर्नार्ड शॉ मिश्कील उद्गाराबद्दल प्रसिद्ध होते. एकदा ते बाथरूममध्ये टबात उघडय़ाने आंघोळ करीत होते त्यांना भेटायला आणि मुलाखत घ्यायला काही पत्रकार आल्याचे त्यांच्या नोकरांनी सांगितले. आंघोळ अर्धवट टाकून उघडय़ा अंगानेच ते हॉलमध्ये आले आणि म्हणाले, ‘मला काहीच लपवायचे नाही. काय विचारायचे ते विचारा!’
Friday, November 19, 2010
अनुभव
कायद्याने तरुणाला मतदानाचा हक्क १८ वर्ष पूर्ण झाल्यावर दिलाय आणि लग्नासाठी वयोमर्यादा २१ आहे,
ह्यातून काय सिद्ध होत? - - - - - ...
एवढच कि देशाला सांभाळण्यापेक्षा बायकोला सांभाळायला जास्त अनुभव लागतो...:)
ह्यातून काय सिद्ध होत? - - - - - ...
एवढच कि देशाला सांभाळण्यापेक्षा बायकोला सांभाळायला जास्त अनुभव लागतो...:)
Labels:
joke of the day,
laugh,
Marriage Humour,
smile
Thursday, November 18, 2010
आकडे
डॉक्टर : काय रे.. रात्री झोप येण्यासाठी मी तुला एक-दोन-तीन-चार असे आकडे मोजायला सांगितलं होतं.
चिन्या : हो.. मोजले की.
डॉक्टर : मग ल
ागली की नाही झोप? काय फरक वाटला?
चिन्या : ते कळलं नाही, पण ३ लाख ३४४ पर्यंत पोहोचलो आणि तितक्यात सकाळच झाली
चिन्या : हो.. मोजले की.
डॉक्टर : मग ल
ागली की नाही झोप? काय फरक वाटला?
चिन्या : ते कळलं नाही, पण ३ लाख ३४४ पर्यंत पोहोचलो आणि तितक्यात सकाळच झाली
बिल
एका हॉटेलच्या बाहेर बोर्ड होता. 'हवं तितकं खा, बिलाची चिंता करू नका. बिल नातवाकडूनच वसूल करण्यात येईल.' बोर्ड पाहून खूश झालेले रामराव हॉटेलमध्ये शिरले. त्यांनी भरपूर पदार्थ मागवले आणि त्यावर ताव मारला. मनसोक्त जेवण झाल्यावर वेटरने त्यांच्यासमोर बिल आणून ठेवलं.
रामराव : अहो हे काय...तुम्ही माझ्या नातवाकडून बिलाचे पैसे घेणार ना? शिवाय बिलात कॉफीचे पण पैसे लावलेत, मी तर कॉफी घेतलेली नाही.
वेटर : (शांतपणे) हे बिल तुमचं नाही.. तुमच्या आजोबांचं आहे.
रामराव : अहो हे काय...तुम्ही माझ्या नातवाकडून बिलाचे पैसे घेणार ना? शिवाय बिलात कॉफीचे पण पैसे लावलेत, मी तर कॉफी घेतलेली नाही.
वेटर : (शांतपणे) हे बिल तुमचं नाही.. तुमच्या आजोबांचं आहे.
Tuesday, November 16, 2010
MAST LIFE
MAST LIFE kise kehte hai?
LEE ka jeans
RAYMOND ka suit ho
BMW car
Amitabh k ghar ke pas bungla ho
&
Aishwrya aakar kahe
THODI CHINI MILEGI.
LEE ka jeans
RAYMOND ka suit ho
BMW car
Amitabh k ghar ke pas bungla ho
&
Aishwrya aakar kahe
THODI CHINI MILEGI.
Monday, November 15, 2010
डोंबल्याचं प्रेम
म्हातारी सरलाबेन नवरा बाहेर पडला की, नेहमी बजावून सांगायची की, ‘बसनेच जा! बस मिळाली नाही त रिक्षा करा!’
‘तुमचं फारच प्रेम दिसत नवऱ्यावर! या वयातसुद्धा किती काळजी करता तुम्ही त्यांची!’ नुकतंच लग्न झालेली शेजारची मालती त्यांना म्हणाली.
‘कसलं डोंबल्याचं प्रेम घेऊन बसलीस?’ सरलाबेन म्हणाली, ‘तो मेला कंजूष पायी पायी जाईल आणि येईल अन पाय दुखतात म्हणून मला रात्रभर चेपायला लावेल, म्हणून त्याला बजावत होते.’

Thursday, November 11, 2010
लिफ्ट
गण्या बस स्टॉपवर उभा होता.
एक मोटरसायकलस्वार त्याच्यापाशी आला आणि त्याने विचारले, '' लिफ्ट हवी आहे का?"
.
.
'गण्या- ''नो थँक्स! माझे घर तळमजल्यावरच आहे!!
एक मोटरसायकलस्वार त्याच्यापाशी आला आणि त्याने विचारले, '' लिफ्ट हवी आहे का?"
.
.
'गण्या- ''नो थँक्स! माझे घर तळमजल्यावरच आहे!!
फोन नंबर
पाईप पाईप
पोर पोर
पाईप
...
पोर
पाईप
पोर
आता तुम्ही विचार करत असाल,कि हा काय प्रकार आहे....???
.
.
.
.
.
.
अहो काही नाही हो...
नेपाली त्याचा फोन नंबर देत आहे...
"५५४४५४५४"
पोर पोर
पाईप
...
पोर
पाईप
पोर
आता तुम्ही विचार करत असाल,कि हा काय प्रकार आहे....???
.
.
.
.
.
.
अहो काही नाही हो...
नेपाली त्याचा फोन नंबर देत आहे...
"५५४४५४५४"
Tuesday, November 9, 2010
प्रगतीपुस्तक
बाबा : (प्रगतीपुस्तक पाहत) गणितात १००, सायन्समध्ये ९०, भाषा ८५, इतिहास-भूगोल ९५. अरे वा... सगळ्या विषयांत छानच मार्क्स मिळालेत की....अरे, पण हे तर तुझं प्रगतीपुस्तक नाहीय.
गणू : हो...बाबा, ते आमच्या वर्गातल्या किशोरचं आहे.
बाबा :का?
गणू : तुम्हीच तर मागे म्हणाला होतात ना...की पुढच्या वेळी मला चांगल्या मार्कांचं प्रगतीपुस्तक पाहायचंय म्हणून.
गणू : हो...बाबा, ते आमच्या वर्गातल्या किशोरचं आहे.
बाबा :का?
गणू : तुम्हीच तर मागे म्हणाला होतात ना...की पुढच्या वेळी मला चांगल्या मार्कांचं प्रगतीपुस्तक पाहायचंय म्हणून.
पाहुण्यांसाठी काहीतरी घेऊन ये
अमितकडे त्याचे मामा, मामी त्यांची तीन मुले आणि मावशी अशी पाहुणेमंडळी अचानक येऊन टपकली. अमितच्या आईला फार आनंद झाला. ती आपल्या भावाचे, भावजयीचे, बहिणीचे स्वागत करायला आनंदाने पुढे झाली. सर्व मंडळी घरात येऊन बसली. चहा-पाणी झाले, बाबा म्हणाले, ‘‘अमित, पाहुण्यांसाठी काहीतरी घेऊन ये. हे ऐकून सर्वजण खुश झाले. अमित बाहेर गेला व पाहुण्यांना स्टेशनवर सोडण्यासाठी दोन रिक्षा घेऊन आला.
Monday, November 1, 2010
pati patni
Pati-Meri Nazar Kamzor Ho Gayi Hai Sochta Hu Chashma Banwa Lu
Patni- Rehne Do,
Colony Me Mujhase Sundar Koi Nahi He
Patni- Rehne Do,
Colony Me Mujhase Sundar Koi Nahi He
Labels:
joke of the day,
laugh,
Marriage Humour,
smile
जेवायला मिळणार नाही
एका ऑफिसात एक विचित्र स्पर्धा लागली. जास्तीत जास्त कोण खाऊन दाखवतो याची. एका माणसाने पंधरा डोसे, वीस इडल्या, दहा कप कॉफी, तीन सामोसे एवढं खाऊन बक्षिस जिंकले.
बक्षिस स्वीकारताना तो म्हणाला, ‘‘हे कृपया माझ्या घरी कळू देऊ नका. नाहीतर मला घरी गेल्यावर जेवायला मिळणार नाही.’’
बक्षिस स्वीकारताना तो म्हणाला, ‘‘हे कृपया माझ्या घरी कळू देऊ नका. नाहीतर मला घरी गेल्यावर जेवायला मिळणार नाही.’’
फराळ
दिवाळीच्या फराळाचे स्वयंपाकघरात चालले असता राधाबाईने मुलास आगगाडी खेळावयास देऊन बाहेर जाण्यास सांगितले, पण थोडय़ाच वेळाने चिरंजीवांची स्वारी आगगाडी ओढीत-ओढीत स्वयंपाकघराच्या दाराकडे येऊ लागली तेव्हा..
राधाबाई- ‘‘आता इकडे कशाला आणली आगगाडी? जा, तिकडे बाहेर खेळ जा.’’
मुलगा- ‘‘बाहेर कोठे जा? या स्टेशनावर आमची आगगाडी उतारुंचा फराळ होईपर्यंत अर्धा तास थांबणार आहे.’’
राधाबाई- ‘‘आता इकडे कशाला आणली आगगाडी? जा, तिकडे बाहेर खेळ जा.’’
मुलगा- ‘‘बाहेर कोठे जा? या स्टेशनावर आमची आगगाडी उतारुंचा फराळ होईपर्यंत अर्धा तास थांबणार आहे.’’
Subscribe to:
Posts (Atom)