Saturday, October 22, 2011

कारण

बायको : तू म्हणाला होतास की कारणाशिवाय दारू पिणार नाही म्हणून?

नवरा : मग? आता दिवाळी येतेय ना? रॉकेट उडवायला रिकामी बाटली नको!

Sunday, October 16, 2011

भेटीची वेळ

डॉक्टर : माझ्या सेक्रेटरीशी बोलून भेटीची वेळ फिक्स करा.


पेशंट : दोनचा प्रयत्न केला... पण तिने नकार दिला भेटायला!!

Saturday, October 15, 2011

वाटावं

कधी खूप वाटतं की,


काहीतरी वाटावं....

कधी वाटतं की, काही वाटू नये....

नंतर वाटतं की, काही वाटण्यापेक्षा,

सरळ मिक्सरमधून

बारीक करून घ्यावं!!

Friday, October 14, 2011

झोप

जज : तू दिवसाढवळ्या चोरी केलीस??


चोर : काय करणार, साहेब? मला रात्री झोप येते!!