Tuesday, June 19, 2012

मजबुरी

बंडू - अरे तू तर मनुशी एंगेजमेंट तोडणार होतास ना ? मग लग्न का केलंस ?
खंडू - मजबुरी होती रे
बंडू - काय मजबुरी होती ?
खंडू - एंगेजमेंट होण्यापासून ते तोडण्यापर्यंतच्या काळात ती एवढी लट्ठ झाली की ती महागडी अंगठी खूप प्रयत्न करूनही तिच्या बोटातून निघाली नाही अन् नाईलाजाने मला तिच्याशी लग्न करावं लागलं.

Friday, March 9, 2012

त्रास

गंपू : आयुष्यात लहान लहान गोष्टीच खूप त्रास देतात...

झंपू : कसं काय?

गंपू - एकदा टाचणीवर बसून बघ!!!

Sunday, February 26, 2012

सबमिशन

मुलगा : मी तुझ्यासाठी एव्हरेस्टही सर करेन... पॅसिफिक महासागर पोहून जाईन... जळत्या कोळशावरून अनवाणी चालत जाईन...

मुलगी : ते जाऊ दे रे... उद्या स्टेशनला भेटशील का?

मुलगा : हट्! उद्या? वेडी आहेस का? परवा सबमिशन आहे!

Wednesday, February 1, 2012

फुटबॉल

रिक्षावाले कधीच फुटबॉल खेळू शकत नाहीत का?
.
.
.
.
... .
.
.
.
.
कारण ते हाताने किक मारतात:P

Tuesday, January 31, 2012

मला वर नको मला वधू दे

बंड्या च्या तपस्येवर खुश होऊन एक
आकाशवाणी झाली वर माग वत्सा ……………. त्या वर बंड्या म्हणाला , “अरे देवा तू समजतोस तसा मी नाही , मला वर नको मला वधू दे “

किती मार्क कमी पडले

तपासणीनंतर डॉक्टर ,बंडूला : तुम्हाला सांगताना वाईट वाटतंय , पण तुमची किडनी फेल झाली आहे...

बंडू रडायला लागतो..
...
थोड्या वेळाने विचारतो : " डॉक्टर, पण किती मार्क कमी पडले..?" :P:P:P

पी.पी..पी...पी

एक दुधवाला दुध घेउन रस्त्याने जात असतो आणि अचानक तो दुध पिउन टाकतो... का??
.
.
.
.
.
कारण मागुन गाडी हॉर्न वाजवते, पी.पी..पी...पी

वीज

गावात वीज येणार म्हणून गावकरी खूप आनंदात होते. नाचत, गात होते. त्यांच्याबरोबर एक कुत्राही डोलत, नाचत होता.

गावकर्‍यांनी त्याला विचारले, ''वीज येणार म्हणून आम्हाला आनंद झालाय, लोक नाचत आहेत...आम्ही समजू शकतो. पण तू का नाचतोस?''

कुत्रा स्वप्नाळू डोळ्यांनी डोलत, नाचत म्हणाला, ''वीज आली की गावात बरेच खांब पण येतील......''!!!!

Friday, January 13, 2012

Joke of the Day: साम्य आहे?

Joke of the Day: साम्य आहे?: मास्तर: मुलांनो, डॉक्टर आणि विद्यार्थी यांच्यात काय साम्य आहे? सदू : ऑपरेशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात. मास्...

साम्य आहे?

मास्तर: मुलांनो, डॉक्टर आणि विद्यार्थी यांच्यात काय साम्य आहे?

सदू : ऑपरेशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.

मास्तर : काय ते?

सदू : आम्ही आमच्या परीने प्रयत्न केले, पण आताच काही सांगू शकत नाही.