Saturday, February 14, 2009

पाणबुडी

सरदार मंडळींना घेऊन जाणारी पाणबुडी कशी बुडवाल ?
...............
..............
..............
लढाई करुन ?


छे छे तसं बिलकुल नाही, अगदी सोपा उपाय आहे.
काय माहित आहे का ?
फक्त पाणबुडीच्या दाराव टकटक करा.

खरं प्रेम म्हणजे काय?

एका सुंदर संध्याकाळी जुहू बीचच्या वाळूवर, भेळपुरीवाल्यांच्या किलबिलाटात तुम्ही गर्लफ्रेण्डचा हात हातात घेऊन तिला सांगता.... मी 'सत्यम'मधे नोकरी करतो...

आणि तरीही ती तुमच्याशी लग्न करा
मालतीला मध्यरात्री अचानक जाग येते आणि शेजारी पहाते तर तिचा नवरा माधव जागेवर नाही. ती त्याला शोधत शोधत स्वयंपाकघरात येते. तिथे माधव एका खुर्चीवर बसून गंभीर मुद्रेने काहीतरी विचार करताना तिला दिसतो.
मालती: "काय झाल माधव ? एवढ्या रात्री काय विचार करत आहेस ? काही चिंता आहे का तुला ?"
माधव: " तुला आठवतय , आपण जेव्हा नुकतेच एकत्र फिरायला लागलो होतो आणि तू फक्त १८ वर्षांची होतीस."
मालती: "हो. आठवतय की."
माधव: " तुला आठवतय तुझ्या बाबांनी आपल्याला बागेत पकडल होतं ?"
मालती: "हो. आठवतय ना".
मालती आता शेजारच्या खुर्चीत बसते.
माधव: " आणि मग त्यांनी माझ्यावर बंदूक रोखली आणि म्हणाले की, एकतर माझ्या मुलीशी लग्न कर नाहीतर मी तुला २० वर्ष तुरूंगात धाडीन."
मालती : "हो रे! आठवतय. पण आत्ता का विचारतो आहेस हे सगळं ? "
माधव (उदास स्वरात) : "अग थोडं धाडस केल असत तर आज मी आज मुक्त झालो असतो ग!"

Friday, February 13, 2009

भांडण

एका जोडप्याची रोज भांडण होत असतात.


एक दिवस वैतागून पत्नी म्हणते, "ते शेजारचे बघा. सारखा हसण्याचा आवाज येत असतो त्यांच्या घरातून. नाही तर आपण. शिका काही त्यांच्याकडून."

पती:"ठीक आहे. आपण त्याना विचारुया की त्यांची भांडण का होत नाहीत ते."

ते शेजारच्या घरात जातात. शेजारचे त्यांच स्वागत करतात आणि विचारतात कस काय येण केल म्हणून.

पती: "त्याच काय आहे की आमची रोज भांडण होतात. तुमच्या घरातून मात्र सारखे हसण्याचे आवाज़ येत असतात. हे कस काय जमत तुम्हा दोघांना? आम्हाला पण सांगा."

शेजारचे म्हणतात "त्याच अस आहे की आमची पण रोज भांडण होतात आणि मग माझी बायको मला हाताला येइल ती वस्तु फेकून मारते. तिचा नेम चुकला तर मी मोठयाने हसतो आणि नेम बरोबर बसला तर ती मोठयाने हसते. म्हणूनच आमच्या घरातून कायम हसण्याचे आवाज येत असतात."

Thursday, February 12, 2009

मी नाही पाहिलं

दरोडेखोरांच्या टोळीने बँकेत दरोडा घातला. बाहेर पडताना त्यांचा म्होरक्या एका बँक कर्मचा-याच्या समोर गेला.
म्होरक्या - आम्हाला दरोडा घालताना
पाहिलस ?
कर्मचारी - होय
म्हरोक्याने त्याला गोळी मारुन ठार केले.
त्यानंतर म्होरक्या दुस-या कर्मचा-याकडे गेला.
म्होरक्या - आम्हाला दरोडा घालताना पाहिलस ?
दुसरा कर्मचारी - मी नाही पाहिलं, पण माझ्या बायकोनं पाहिलयं.

Saturday, February 7, 2009

ए सुंदरी

भिकारी : ए सुंदरी, आंधळा आहे. पाच रुपये दे ना
(त्याच्या बायकोला) : दे दे, पाच रुपये दे त्याला. तुला सुंदरी म्हणाला तो. नक्कीच आंधळा दिसतोय.

Friday, February 6, 2009

दूध

संाः एक लिटर गायीचे दूध दे
दूधवालाः साहेब, तुमचं भांड छोट आहे. यात एवढं दूध मावणार नाही
संाः मग बकरीचे दे

Thursday, February 5, 2009

ओ बिरबल!

भारत-पाकची मॅच असते. एका सरदारजीने सगळ्यात महागड्या पॅवेलियनचं तिकीट काढलेलं असतं. पण त्याला घरून निघायला उशीर होतो. बसस्टॉपवर बसची बराच वेळ वाट पाहिल्यावर अखेरीस बस येते. बसमधे चढणार एवढ्यात मागून कोणीतरी हाक मारतं, 'ओए बिरबल!'
तो वैतागून मागे बघतो. तर मागे कोणीच नाही. आणि त्याची ती बस चुकते.
स्वत:शीच पुटपुटत तो टॅक्सीत बसतो. प्रचंड ट्राफिकमधून एकदाचा वानखडेला पोहोचल्यावर रस्ता क्रॉस करायलाही त्याला संधी मिळत नाही. शेवटी सिग्नल पडतो आणि तो रस्ता क्रॉस करणार... एवढ्यात पुन्हा हाक, 'ओए बिरबल!'
तो पुन्हा वैतागून मागे बघतो. मागे कोणीच नाही. दुदैर्वाने तेवढ्यात ट्राफिक सुरू होतो आणि त्याला वाट पाहत उभं राहावं लागतं.
शेवटी कसाबसा स्टेडियमवर पोहोचतो. शेवटच्या पाच ओवर्स राहिल्या असतात. सामना एकदम अटीतटीचा झालेला असतो. शेवटचा बॉल... शेवटची रन, आता कोण जिंकणार? डोळ्यात प्राण आणून पाहत असतानाच, पुन्हा मागून हाक येते, 'ओए बिरबल.'
कोण हाक मारतंय, ते पाहण्यासाठी वळून बघतो आणि तो ऐतिहासिक शॉट 'याचि देही' पाहायची संधी हुकते.
चरफडत तो घरी जायला निघतो. घरी पोहोचतो. चावीने दरवाजा उघडणार... एवढ्यात पुन्हा तीच हाक, 'ओए बिरबल.'
आता मात्र त्याचा तीळपापड उडतो. रागाने मोठ्याने ओरडून तो म्हणतो...
साले कौन हे बे... मेरा नाम बिरबल नही बलबीर है बलबीर!

Wednesday, February 4, 2009

लिफ्ट

संता बस स्टॉपवर उभा होता. एक मोटरसायकलस्वार त्याच्यापाशी आला आणि त्याने विचारले, ''तुम्हाला लिफ्ट हवी आहे का?''
संता म्हणाला, ''नो थँक्स! माझे घर तळमजल्यावरच आहे!!!!!''

धीर देणारा संता

एक दिवस घाटातून जाणा - या एका बसला जोरदार अपघात होतो. त्या बसचं खूप नुकसान तर होतंच, शिवाय त्या प्रवाशांच्या जिवाचं आणि वस्तूंचंही प्रचंड नुकसान होतं. जख्मींपैकी एकाला शुद्ध येते आणि एकंदर परिस्थिती पाहून तो धाय मोकलून रडायला लागतो.
जख्मी : अरे देवा मी आता काय करू? या अपघातात माझा हात तुटलाय. माझ्या आयुष्याचं नुकसान झालं रे.
सन्ता लांब राहून अपघात पाहत असतो. त्या जख्मी माणसाचं दु:ख त्याला पाहवत नाही आणि तो धावत त्याच्या जवळ जातो.
सन्ता : अहो, असे रडू नका. हे पाणी प्या पाहू. कशाला एवढं रडायचं ते. आत्ता मदत पोहोचेल आपल्याला.
जख्मी : तुम्हाला कसं सांगू हो. या अपघातात पाहा माझा हातच तुटलाय. आता मी कोणाकडे पाहू.
सन्ता : अहो, असा धीर नसतो बरं सोडायचा. तो तिथे पडलेला माणूस पाहा. त्याचं तर डोकं तुटलंय. तरी बिचारा हूं की चू करत नाहीय.