Thursday, April 9, 2009

पगारवाढ

‘‘सर, मला पगारवाढ मिळालीच पाहिजे.’’ राकेशने साहेबांना ठणकावून सांगितले अन् पुढे बोलला, ‘‘तीन तीन कंपन्या माझ्या मागे लागल्यात..’’ साहेबांनी विचारले, ‘‘असं? कोणत्या कंपन्या?’’ राकेश उत्तरला. ‘‘वीज, टेलिफोन आणि विमा कंपनी.. त्यांची देणी थकलीयत. म्हणून.’’

१० वर्षं

अशोक, बबन आणि किरण या तिघांना घरफोडी करत असताना पकडले जाते. तिघांनाही १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात येते. मात्र, तिघांचाही हा पहिलाच गुन्हा आहे हे लक्षात घेऊन त्यांच्या आवडीची कोणतीही एक वस्तू तुरुंगात नेण्याची परवानगी देण्यात येते. अशोक १० वर्षे पुरतील एवढी पुस्तके तुरुंगात घेऊन जातो. बबन असतो पक्का दारुडा. तो १० वर्षे पुरतील एवढय़ा व्हिस्कीच्या बाटल्या आत घेऊन जातो. किरण असतो चेनस्मोकर. तो १० वर्षांचा सिगारेटचा साठा आत घेऊन जातो.
१० वर्षांनी तिघांची तुरुंगातून सुटका होते. अशोक वाचलेल्या पुस्तकांतील सुविचार, कविता इ. मोठय़ाने म्हणत बाहेर येतो. पिऊन ‘टाइट’ असलेला बबन अडखळत बाहेर येतो. किरण दाराबाहेर आपले डोके काढून विचारतो, ‘‘कुणाकडे माचिस आहे का माचिस?’’

लग्न करतोय म्हटलं

’ ‘अगं मी राजूला आज घरी जेवायला घेऊन येणार आहे.’ सुरेश आपल्या बायकोला मोबाईलवर सांगत होता.
रात्री जेवायला? अहो तुम्हाला काही समजत नाही का? आज पोळीवाली बाई येणार नाहीत. मला सर्दी झाली आहे. आपल्या मैथुला ताप आहे. गॅसचा पत्ता नाही.
थांब, थांब हे सगळं माझ्या लक्षात आहे. म्हणूनच तर मी त्याला आणतो आहे. लग्न करतोय म्हटलं तो..

उम्र का अंदाज

मेरी बहन अपनी पोती को बगल वाली सीट पर बिठा कर कार चला रही थी।
मेरी बहन को अच्छे मूड में देखकर उसकी पोती ने पूछा,“ दादी, क्या दादाजी उम्र में आपसे बड़े हैं?”
मेरी बहन को अपने बारे में ऐसी तारीफ सुनना काफी अच्छा लगा। उसने अपनी पोती को जवाब दिया, “हां कुछ साल बड़े हैं।”

पर उसने पोती से सवाल किया, “पर तुमने यह क्यों पूछा?”

“इसलिए कि उनकी मूंछें आपकी मूछों से लंबी है।”

Wednesday, April 8, 2009

टारगेट

बंडू : एस्क्युज मी, गेल्या दोन दिवसांपासून मी इथे रस्ता चुकलोय. मला प्लीज सांगाल का, मी नक्की कुठे आलोय ते.

यम : हा हा हा... अरे माणसा तू मेलायस आणि यमसदनात आलायस.

बंडू : नहीईईई... हे भगवान तुने ये क्या कर दिया. मुझे टाइमसे पेहलेही उठाया.

यम : ए गपे. अरे आमचंही इयरएण्डिंग आहे. आम्हालाही टारगेट पूर्ण करावं लागतं बाबा. काय समजलास...

शराब

सूबेदार संता और सूबेदार इमामुद्दीन ब्रिटिश फौज के एक ही रेजिमेंट में थे। दोनों आपस में गहरे दोस्त थे। दोनों हर शाम शराब पिया करते।

विभाजन के बाद इमामुद्दीन पाकिस्तान चला गया। अपने दोस्त की याद को जिलाए रखने के लिए सूबेदार संता हमेशा दो गिलासों को शराब से भरकर बारी-बारी से चुस्की लिया करता। एक दिन बार के मालिक ने संता से ऐसा करने का कारण पूछा।


“यह गिलास इमामुद्दीन है और यह मैं हूं। इसलिए मैं दोनों में से थोड़ा-थोड़ा पीता हूं। एक इमामुद्दीन के लिए और एक मैं अपने लिए।”

बार के मालिक ने एक शाम संता को एक ही गिलास लिए बैठा देखा। उसने संता से उसका कारण पूछा।


संता ने जवाब दिया,“मैंने शराब पीनी छोड़ दी है। पर इमामुद्दीन ने नहीं छोड़ी है। मैं उसकी तरफ से पीता हूं।”

प्रेम

भक्त : दिवसा चैन पडत नाही. रात्री झोप लागत नाही. सबंध दिवस अस्वस्थ असतो. काहीच नकोनकोसं वाटतं. हे देवा, हेच का प्रेम आहे.
देव : नाही मुर्खा, हे प्रेम नाही. ही उन्हालाची सुरुवात आहे.

Thursday, April 2, 2009

टेक्नॉलॉजी.

चिंटू : पिंट्या तुझे दात असे निळे का बरं दिसतायत

पिंटू : अरे सकाळी पेस्टच्या ऐवजी मी दातांना शाई लावलीय ना.

चिंटू : शाई... ती का?

पिंटू : टेक्नॉलॉजी मित्रा टेक्नॉलॉजी. सध्या सगळा जमाना ब्लू टूथचा आहे बरं.

Wednesday, April 1, 2009

फक्त प्रौढांसाठीच

आज या इथे छापण्यात येत असलेला मजकूर फक्त प्रौढांसाठीच आहे. तुमचं वय १८ पेक्षा जास्त असेल तरच वाचा.

...

...

...

...

...


लवकरच निवडणुका आहेत.

१८ वर्षांच्या पुढील सगळ्यांनी मतदान कराच.

भूगोल

गुळमुळे गुरुजी : बंड्या आज भूगोल शिकूया बरे.


बंड्या : गुरुजी भूगोल मला भारी आवडतो. तो एकदम सोप्पा विषय ऑ.

गुळमुळे गुरुजी : अशे... बरे बरे तर सांग पाहू, आपल्या पृथ्वीचा आकार कोणता आहे.

बंड्या : सोप्पाय की, चौकोनी.

गुळमुळे गुरुजी : शिंच्या, मेल्या भूगोल सोप्पा म्हणतोस आणि पृथ्वीला चौकोन म्हणतोस? अरे गोल की रे ती.

बंड्या : नाही हो गुरुजी. तुम्हीच परवा शिकवलंत ना. कोलंबस पृथ्वीच्या चारही कोपऱ्यात फिरून आला म्हणून. मग..??