Friday, May 8, 2009

view

लॉजिंग बोर्डिग

एका लॉजिंग बोर्डिगवर एक विवाहित जोडपं मौजमजा करण्यासाठी गेलं होतं. परंतु तेथील व्यवस्थापकाने सांगितलं की, आम्ही तुम्हाला खोली देऊ शकत नाही. तेव्हा तो गृहस्थ म्हणाला की, तुमच्या डोक्याजवळ जी पाटी लावली आहे तिच्यावर तर विवाहित जोडप्यासाठी येथे खोली मिळेल, असं लिहिलंय आणि आम्ही दोघेही विवाहित आहोत. तेव्हा तो व्यवस्थापक म्हणाला की, तुम्ही या पाटीवर कंसात काय लिहिलंत हे नीट वाचलेलं नाही. त्यात स्वच्छ लिहिलंय की, परस्पराशी विवाह झालेल्या जोडप्यास खोली दिली जाईल.

अभिनंदन

१) एक मैत्रीण- भांडी धुण्यासाठी तू काय वापरतेस?
दुसरी - मी खूप वस्तू वापरून पाहिल्यात. पण मला माझा नवराच सर्वोत्तम वाटला.
२) ‘मी इस्त्रीचे बटण बंद करायला विसरलो’
‘काही हरकत नाही. घराला आग लागणार नाही, मी पाण्याचा नळ चालू ठेवला आहे.’
३) ‘अभिनंदन - बरोबर २ वाजता तुम्हाला जुळे झाले’ परिचारिका (नर्स) म्हणाली. त्यावर पती म्हणाला, ‘दोन वाजता ती प्रसूत झाली ही ठीकच झाले. ती दोन तास आधी प्रसूत झाली असती तर मात्र माझी धडगत नव्हती!’

मुलगा

मुलाच्या वाढदिवसाला नंदूच्या मित्राने एक भले मोठे प्रेझेंट आणले. नंदू त्याबद्दल नाराजीच्या सुरात म्हणाला, ‘‘अरे एवढे मोठे प्रेझंट कशाला आणले?’’ यावर मित्र म्हणाला, ‘‘असू दे रे! मी तुला दिले का? तू गप्प बैस!’’ नंदू म्हणाला, ‘‘अरे पण! खरंच याची गरज होती का?’’ यावर नंदूचा मित्र अगदी सहज बोलला, ‘‘गरज का नाही? मुलगा काय तुझ्या एकटय़ाचा आहे का?’’

गाईड

‘‘हा किल्ला ३०७ वर्षांपूर्वीचा आहे.’’ ठाम आवाजात किल्ल्याकडे हात दाखवत गाईड पर्यटकांना म्हणाला.
‘‘अगदी बरोबर ३०७ र्वष कशावरून?’’ असा तिरकस प्रश्न पुणेरी पर्यटकांशिवाय कोण विचारणार!
‘‘मी पाच वर्षांपूर्वी येथे नोकरीस लागलो तेव्हा मला या किल्ल्याचे वय ३०२ र्वष सांगण्यात आले होते.’’
पुणेकर चुप्प.
या उलट हा किस्सा-
‘‘हा महाल ३१५ वर्षांपूर्वीचा आहे.’’ गाईड
‘‘अहो चार वर्षांपूर्वी तुम्ही आम्हाला ३१५ चा आकडा सांगितला होता-’’ एक दुसऱ्यांदा त्या स्थळी आलेला शंकेखोर पर्यटक बोललाच.

‘‘मी येथे आहे तोपर्यंत हाच आकडा राहणार. कोणाची बदलायची हिंमत नाही!’’ गाईड.
’ गोव्यात मांडवी नदीतून चाललेली सफर. पाण्याच्या लाटांबरोबर गाईडची टकळी चालू. ‘‘नाऊ, माय फ्रेंडस्- तुम्ही आता कोठलाही गुन्हा करा, चोरी करा, पाकीट मारा.’’ गाईड.
‘‘आँ-’’ पर्यटक अचंबित.
‘‘तो बोर्ड बघा- वेलकम टु अग्वाद जेल’’- गाईडचा मिश्कील आवाज.

Thursday, May 7, 2009

सेलिब्रेट

समोरच्या कारची धडक बसल्याने संतापलेले पाटीलसाहेब आपल्या कारमधून उतरून त्याला जाब विचारायला धावले. धडक देणारा पटेल दोन्ही गाडय़ांचं झालेलं नुकसान पाहत शांतपणे म्हणाला, ‘‘माय मिस्टेक. मी तुम्हाला २५०० रुपये देतो. लगेच मिटवून टाकू.’’ कंपनीचीच कार वापरणारे पाटील मनातून खूश झाले. पटेल पुढे बोलला, ‘‘चला मला गाडी बदलायचीच होती. तुमच्यामुळे निमित्त मिळालं. आपण हे सेलिब्रेट करू.’’ पटेलने आपल्या गाडीतून व्हिस्कीची बाटली अन् दोन ग्लास काढले. पाटीलसाहेबांनी आनंदाच्या भरात उभ्या उभ्या तीन पेग घेतलेसुद्धा. अन् एकदम वरमून पटेलला म्हणाले, ‘‘अरे, मी एकटाच घेतोय. तुम्ही का घेत नाही?’’ पटेलने ती बाटली अन् ग्लास पाटीलसाहेबांच्या हातून घेऊन त्यांच्याच गाडीत ठेवले. अन् उद्गारला, ‘‘आता वाहतूक पोलीस येऊ दे, चौकीवर तपासणी होऊ द्या कोण प्यायलं त्याची. त्यानंतर घरी जाऊन घेईन की मी आरामात.’’

उशीर

मॅनेजर - आज ऑफिसात उशिरा का आलात?
कर्मचारी - साहेब, मी गाडीला हात दिला, पण थांबली नाही.
मॅनेजर - कोणती गाडी होती ती?
कर्मचारी - लोकल ट्रेन.

Monday, May 4, 2009

Tonic for the day

Interviewer> To bataiye PANI ke bina Insan kaise Marega?
Sardar> PANI nai hoga to Insan Tairega kaise? Aur Tairega nahi to doob jayega!

Friend: I got a brand new Ford IKON for my wife!
Sardar: Wow!!! That's an unbelievable exchange offer!!!

Teacher: Which is the oldest animal in world?
Sardar: ZEBRA. Black & White zamaane ka hai

Judge: Don't U have any shame? It is d 3rd time U R coming to court.
Sardar to judge: Oye, tu toh roj hi aata hai!!!

Sir: What is difference between Orange and Apple?
Sardar: Color of Apple is not APPLE.

बंडय़ा

रोगी- ‘‘डॉक्टरसाहेब, मी जेव्हा श्वास घेतो तेव्हा माझ्या छातीत दुखते?’’
डॉक्टर- ‘‘मग तुम्ही श्वास घेणं बंद करा!’’
------------
गुरुजी- बंडय़ा ‘मृतसमुद्र’ कुठे आहे?
बंडय़ा- गुरुजी तो स्वर्गात आहे!
------------
गुरुजी- ‘‘बंडय़ा तू कधी उडती तबकडी पाहिली आहे कां?
बंडय़ा- ‘‘होय गुरुजी, मी काल रात्री ती पाहिली जेव्हा आईने ती बाबाच्या अंगावर फेकली.’’

Saturday, May 2, 2009

क्रेडिट कार्ड

आपण कुठल्या ना कुठल्या कामात असताना ह्या क्रेडिट कार्ड वाल्यांचा फोन येत नाही असे होत नाही. आधि मला सुध्दा संताप यायचा पण मग आता आम्ही ह्याचा आनंद घ्यायला शिकलो आहे, आणी आता तर आमची खात्रीच झाली आहे कि हे फोन आम्हाला तणावमुक्त करण्यासाठीच येतात. आपल्यालाहि ह्यातुन काही फायदा व्हावा ह्या सदहेतुने आमचे संभाषण येथे देत आहोत. (ह्यात कोणालाहि दुखवायचा हेतु नाही.)
वेळ :- दुपारी २.१५ (गरगरित जेवण करुन नुकतेच आडवे झालो आहोत)
कन्या :- गुड आफ्टरनून सर, आय एम कॉलींग फ्रॉम दरोडा बॅंक.
आम्ही :- जय महाराष्ट्र ! (पहिल्याच चेंडुवर षटकार)
कन्या :- नमस्ते सर, मी दरोडा बॅंकेमधुन बोलतीये, आम्ही एक नविन क्रेडिट कार्ड
लॉंच करतोय त्या विषयी माहिति द्यायला हा फोन केला होता सर. तुम्ही इंट्रेस्टेड
आहात का सर ?
आम्ही :- कोणाच्यात ?
कन्या :- सर कार्डमध्ये हो
आम्ही :- ओह्ह अच्छा , काय आहे ना कि आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी येवढ्या गोड
आवाजात इंट्रेस्टेड आहात का ? असे विचारले हो, त्यामुळे जरा गोंधळ उडाला बघा.
कन्या :- (मनातल्या मनात खुश झाली असावी) मग सर तुम्हाला कधि वेळ आहे ?
आम्ही :- अहो तुमच्या साठी वेळच वेळ आहे आमच्याकडे !
कन्या :- तसे नाही सर, ह्या कार्ड विषयी माहिती देण्यासाठी.
आम्ही :- अहो असे मला गोंधळवु नका हो, एक तर सुंदर मुलीशी बोलायचे म्हणजे आमची
आधिच वाचा बसते. मला सांगा तुमच्याच कार्डची माहिती मी तुम्हाला कशी आणी का
द्यायची ?
कन्या :- (डबल खुश होत ) अय्या अहो सर म्हणजे तुम्हाला कधी वेळ आहे ? आमचा
प्रतिनिधी येउन तुम्हाला पुर्ण माहिती देइल.
आम्ही :- एक प्रश्न विचारतो रागवु नका, तुमचे नाव मंजिरी आहे का हो ? आणी
तुम्ही अहिल्यादेवी शाळेत होता का ?
कन्या :- नाही ! आपण कार्ड विषयी बोलुयात का ?
आम्ही :- बघा रागवलात ना तुम्ही ? आहो एक खुप चांगली मैत्रिण होती हो माझी ह्या
नावाची, अगदी असाच गोड आवाज आणी असेच जड जड मराठी शब्द वापरायची सवय होती हो
तिला. तुमचा आवाज ऐकला आणी तिच आठवली बघा पटकन, माफ़ करा मला. म्हणतात ना आपली
दुख: हि लोकासाठी विनोद असतात तेच खरे.
कन्या :- (भावुक स्वरात) नाही रागावले नाही सर. कुठे असतात त्या आता ? त्या पण
बॅंकेत असतात का ?
आम्ही :- नाही हो, लहानपणीचा ताटातुट झाली आमची, कुठे आहे काय करते … काही
काही माहीत नाही हो. (आम्ही जमेल तेव्हड्या दु:खी सुरात)
कन्या :- (चिकाटी न सोडता) ओह, सो सॉरी सर. आज वेळ काढु शकाल का सर तुम्ही ?
आम्ही :- हो जरूर, तुम्हाला भेटुन आनंदच होइल मला. पुन्हा त्या जुन्या आठवणी
ताज्या होतील आणी मग आज तरी निदान दारू ची गरज लागणार नाही मला… (फुल्ल टु
देवदास इस्टायील)
कन्या :- सर, मला भेटुन ? आमचा त्या भागातला एजंट येउन भेटेल सर तुम्हाला. मी
नाही. (हळु हळु कन्या त्रासीक स्वरात बोलायला लागली आहे.)
आम्ही :- अरे असे कसे ? फोन करणार तुम्ही, वेळ देणार आम्ही तुम्हाला, आणी तो का
भेटायला येणार ? मेहनत करे मुर्गा आपले मुर्गी आणी अंडा खाये फकीर ?
कन्या :- (प्रचंड नाराजीने) सर, आम्ही फक्त कॉल सेंटर साठी काम करतो. लोकांना
भेटण्यासाठी वेगळी माणसे नेमली आहेत.
आम्ही :- अच्छा म्हणजे फोनवर टोप्या घालणारी आणी प्रत्यक्षात टोप्या घालणारी
वेगवेगळी माणसे आहेत तर !!
कन्या :- पार्डन सर ?? (आतुन संतापाचे स्फोट होत असावेत त्यामुळे कन्या परत
इंग्लिश वर घसरली आहे)
आम्ही :- नाही म्हणजे तुमच्या भेटिचा योग नाहीच म्हणा की, काये मन कसे वेडे
असते बघा, लगेच तुमच्या भेटीची स्वप्न रंगवुन तय्यार. लबाड कुठले !
कन्या :- सर सध्या तुम्ही कुठले कार्ड वापरत आहात ?
आम्ही :- नेटवाला.कॉम चे. पण ४ वर्ष झाली अजुन कसे आणी कुठे वापरायचे ते कळाले
नाहिये.
कन्या :- सर, मी क्रेडिट कार्ड बद्दल बोलत आहे.
आम्ही :- हो, ते तुम्ही फोन उचलल्या उचलल्या सांगीतलेत की !
कन्या :- सर, आय मिन सध्या तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड वापरता ?
आम्ही :- अहो रेशन कार्ड नाहिये माझ्याकडे अजुन, क्रेडिट कार्ड बद्दल काय
विचारताय ? पण खरच आपण नाहि का हो भेटु शकणार ? अगदी तुमच्या सोयीच्या वेळी.
कन्या :- सर तुम्हाला कार्ड हवे आहे का ? मला बाकीच्या ग्राहकांना सुध्दा फोन
करायचे आहेत. प्लिज कार्ड विषयी बोला.
आम्ही :- तुम्ही तुमचे काम उरकुन घ्या ना निवांत. माझा नंबर तर आहेच तुमच्याकडे,
संध्याकाळी तुम्ही मोकळ्या झाल्यात की मग एक मिस कॉल द्या, मी करतो तुम्हाला
फोन.
(पलिकडुन असभ्य काहितरी पुटपुटल्याचे ऐकु येउन खाडकन फोन आदळला जातो.)