Monday, February 15, 2010

एकही शब्द नाही - not a single word

कोर्टात जजने पोलीस ऑफिसरला विचारले, ‘तुम्ही जेव्हा आरोपीस अटक करावयास गेलात, तेव्हा तो काय म्हणाला.
पो.ऑ.- शिव्या वगैरे वगळून सांगू का सर?
जज- अर्थात.
पो.ऑ.- तो एकही शब्द बोलला नाही सर.

Thursday, February 11, 2010

रुमाल

एकदा गंगुबाई एक रुमाल खूप धुते. साबण लावून लावून धुते. कोपरान् कोपरा धुते आणि काय आश्चर्य...


धुवून झाल्याक्षणी रुमालाची घडी होते.

असं कसं ते?

कारण सोप्पाय,

रुमाल धुण्यासाठी ती 'घडी' डिटर्जंट वापरते ना.

काचेचे ग्लास

संता : अरे हे दुकानवाले वेडेच आहेत की.

बंता : का रे?

संता : अरे हे विकायला ठेवलेले काचेचे ग्लास नीट बघ. वरनं बंद आहेत. आता सांग यात लस्सी कशी बरं ओतायची.

बंता : खरंच की रे. आणि हे ग्लासेस खालून पोकळ ठेवले आहेत. आता लस्सी ग्लासमध्ये कशीबशी घातलीच... तरी त्याचा काय उपयोग?

तुमचा मुलगा करतो काय?

उसने जिस जिस जगह रखे कदम
हमने हर वो जमीन
चूम ली
और वौ बेवफा घर आ के बोले -
' काकू , तुमचा मुलगा माती खातो !!'

हेअरस्टाइल - hair style

दोन शिष्ट मैत्रिणी बोलत असतात.

पहिली : तुझी हेअरस्टाइल खूप छान आहे.

दुसरी : धन्यवाद.

पहिली : ही स्टाइल बदलू नको. ती परत येईल.

‘वन वे’ - one way

‘वन वे’ रस्त्यावरून गाडी घेऊन जाताना ट्रॅफिक पोलिसाने रमणला पकडले.
‘हा वन वे आहे हे तुला माहीत नाही का?’ त्याने विचारले. ‘माहीत आहे’, रमणने उत्तर दिले, ‘मी पण रस्त्याचा ‘वन वे’ वापर करतोय. या रस्त्याने मी परत येणार नाही.’

Tuesday, February 2, 2010

काळजी

एका सैनिकाची पत्नी त्याची खूप काळजी करीत असे. एकदा या व्यवहारी व काटकसरी पत्नीने पाठविलेले पार्सल सैनिकाला मिळाले. त्यासोबतच्या चिठ्ठीत लिहिले होते- जर हे मिठाईचे पार्सल सतरा जानेवारीनंतर मिळाले, तर सर्व मिठाई शत्रूंना देऊन टाका.

बेचव जेवण

पत्नीच्या रोजच्या बेचव जेवणाला कंटाळून अनिल वैतागाने म्हणाला, ‘हे बघ अनघा, तू जरा चार-आठ दिवस माहेरी जा व आईकडून जरा शिकून ये.’ अनघा मान डोलावत म्हणाली, ‘अय्या, माझे बाबा पण आईला हेच सांगतात.’

कमाल का मशिन

संताचा आज पन्नासावा वाढदिवस होता. सकाळपासून मित्रांना जमवून अळट मधून वारंवार पैसे काढून तो मौजमजा करत होता.
पैसे संपल्यावर रात्री ११ वाजता झोकांडे खात मित्रांच्या आधाराने पुन्हा एकदा अळट मशिनसमोर उभा राहिला.
कार्ड आत सरकवताच स्क्रीनवरअक्षरे आली. kkSorry You have crossed todays limit.ll ते वाचून संता ओरडलाच, ‘ओये कमाल का मशिन है! मै कितना पिया उसने बराबर पहचाना.

बायको

बंडोपंत : साहेब… जरा कम्प्लेन्ट लिहून घ्या ना. काल पासून माझी बायको घरी आली नाहीय.

साहेब : अहो हे पोस्ट ऑफीस आहे. पोलिस स्टेशन नाही.

बंडोपंत : काय करू हो. कालपासून एवढा आनंद झालाय की मी काय करतोय, कुठे जातोय.. काहीच कळत नाहीय.