Tuesday, January 31, 2012

पी.पी..पी...पी

एक दुधवाला दुध घेउन रस्त्याने जात असतो आणि अचानक तो दुध पिउन टाकतो... का??
.
.
.
.
.
कारण मागुन गाडी हॉर्न वाजवते, पी.पी..पी...पी

वीज

गावात वीज येणार म्हणून गावकरी खूप आनंदात होते. नाचत, गात होते. त्यांच्याबरोबर एक कुत्राही डोलत, नाचत होता.

गावकर्‍यांनी त्याला विचारले, ''वीज येणार म्हणून आम्हाला आनंद झालाय, लोक नाचत आहेत...आम्ही समजू शकतो. पण तू का नाचतोस?''

कुत्रा स्वप्नाळू डोळ्यांनी डोलत, नाचत म्हणाला, ''वीज आली की गावात बरेच खांब पण येतील......''!!!!

Friday, January 13, 2012

Joke of the Day: साम्य आहे?

Joke of the Day: साम्य आहे?: मास्तर: मुलांनो, डॉक्टर आणि विद्यार्थी यांच्यात काय साम्य आहे? सदू : ऑपरेशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात. मास्...

साम्य आहे?

मास्तर: मुलांनो, डॉक्टर आणि विद्यार्थी यांच्यात काय साम्य आहे?

सदू : ऑपरेशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.

मास्तर : काय ते?

सदू : आम्ही आमच्या परीने प्रयत्न केले, पण आताच काही सांगू शकत नाही.

Tuesday, November 29, 2011

तुम्ही कुठे राहता?

एका कार्यक्रमाच्या वेळी झंपूला एक सुंदर मुलगी भेटते. त्यांच्या गप्पा सुरू होतात. नाव वगैरे विचारल्यानंतर झंपू हळूहळू तिची आणखी चौकशी करू लागतो.

झंपू : तुम्ही कुठे राहता?

मुलगी : एम. जी. रोड

झंपू : कमाल आहे. नशीब ना विचित्रच असतं. काय वेळ येते एकेकावर! एवढ्या सुंदर असून तुम्ही रस्त्यावर राहता?

Tuesday, November 1, 2011

RA-ONE

रा - One चा आवडीचा पदार्थ कोणता ?
घा - One
==================
रा -One चे मूळ गाव ?
माल - One
==================
रा - One ची आवडती डिश?
काल - One
==================
रा - One ला नेहामे कोणता आजार होतो ?
हग - One

Saturday, October 22, 2011

कारण

बायको : तू म्हणाला होतास की कारणाशिवाय दारू पिणार नाही म्हणून?

नवरा : मग? आता दिवाळी येतेय ना? रॉकेट उडवायला रिकामी बाटली नको!

Sunday, October 16, 2011

भेटीची वेळ

डॉक्टर : माझ्या सेक्रेटरीशी बोलून भेटीची वेळ फिक्स करा.


पेशंट : दोनचा प्रयत्न केला... पण तिने नकार दिला भेटायला!!

Saturday, October 15, 2011

वाटावं

कधी खूप वाटतं की,


काहीतरी वाटावं....

कधी वाटतं की, काही वाटू नये....

नंतर वाटतं की, काही वाटण्यापेक्षा,

सरळ मिक्सरमधून

बारीक करून घ्यावं!!

Friday, October 14, 2011

झोप

जज : तू दिवसाढवळ्या चोरी केलीस??


चोर : काय करणार, साहेब? मला रात्री झोप येते!!