Friday, January 30, 2009

वॉटरप्रूफ

चार मुंग्या पोहत असतात.
तीन जणी नीट पोहत असतात.
एक मुंगी मात्र हात वर करून पोहत असते.
का?
कारण तिचं घड्याळ वॉटरप्रूफ नसतं!!!!!

Thursday, January 29, 2009

मुंबईत बर्फ???

बातमी पाहिलीत,
' काल दुपारी मुंबईत बर्फ पडला'...
काय सांगताय?
नाही पाहिलीत?
अर्रर्र, अहो मरीन ड्राइव्हवर बर्फ पडला!
...
एक जण सायकलवरून बर्फ नेत होता... पडला!!!!

Wednesday, January 28, 2009

भिकारी आणि सॉफ्टवेअर इंजीनियर

दोन भिकारी एकमेकांना भेटतात आणि दोन सॉफ्टवेअर इंजीनियर एकमेकांना भेटतात, तेव्हा ते एकमेकांना एकच प्रश्न विचारतात....
तो प्रश्न कोणता?
...
'' हल्ली कोणत्या प्लॅटफॉर्मवर काम करतोयस तू?!!!!!''

Tuesday, January 27, 2009

डॉक्टर डॉक्टर!!!

डॉ. मनकवड्यांच्या क्लिनिकमध्ये आलेला तो माणूस पाहून त्यांची सेक्रेटरी किंचाळलीच... त्याच्या नाकातून कोथिंबिरीच्या जुड्या बाहेर आल्या होत्या. डाव्या कानात काकडी होती. उजव्या कानात गाजर. डोक्यावर केसांमध्ये शेपू चमकत होती. '' डॉक्टर डॉक्टर,'' तिने घाईगडबडीने डॉक्टरांना केबिनबाहेर बोलावले, ''यांना पाहा काय झालंय...'' डॉ. मनकवडे बाहेर आले. त्यांनी त्या माणसाकडे नीट पाहिले आणि म्हणाले, ''एवढं ओरडायचं काय त्यात! या माणसाला खाल्लेलं नीट पचत नाहीये, एवढाच तर त्रास आहे!!!!!''

Monday, January 26, 2009

हायजॅक

विमानाने हवेत झेप घेतली. सीटबेल्ट्स ढिले करण्याची सूचना झाली. अचानक मागच्या रांगेतला एकजण उठून मोठ्याने ओरडला, ''हायजॅक!''
... तात्काळ विमानात घबराट पसरली. हवाई सुंदऱ्या भेदरल्या. हवाई सेवक एकदम अॅलर्ट झाले. बाप्ये केविलवाणे झाले. बायका रडू लागल्या...
... तेवढ्यात पुढच्या रांगेतला एकजण उठून उभा राहिला आणि मागे वळून त्याला म्हणाला, ''हाय जॉन!!!!!!''

Sunday, January 25, 2009

चिमणी

गिरणीची मोठी चिमणी छोट्या चिमणीला रागावून काय म्हणाली?
'' इतक्या लहान वयात धूर काढतेयस! लाज नाही वाटत!!!!''

'का?'

१९७५ साली बंगलोर-म्हैसूर रस्त्यावरच्या एका डोंगराजवळ तीन पक्षी उडत चालले होते... अचानक ते रक्तबंबाळ होऊन कोसळले... का?
अरे आठवा... गब्बरसिंगने 'तीनो बच गये' म्हणत हवेत तीन गोळ्या नव्हत्या का झाडल्या?!!!!!

Saturday, January 24, 2009

कारण

एक मुंगी एकदा स्कूटरवरुन चालली होती. ती अचानक खाली पडली.
का ?
...
...
....
कारण स्कूटर संपली.

Friday, January 23, 2009

आयसीसीयू

दोन झुरळे आयसीसीयूमध्ये अॅडमिट होती. पहिल्या झुरळाने दुस-याला मोठ्या कष्टाने विचारले, ''काय खाल्लेस? बेगॉन स्प्रे?''
दुसरे त्याहून कष्टाने उत्तरले, ''नाही... चप्पल!!!!!''

Thursday, January 22, 2009

पॅरेंटींग

बटाट्याच्या आई-वडिलांना काय म्हणतात?
...



आलू-पालक.