Monday, November 29, 2010

नास्तिक

मुलाची आई (मुलीच्या आईला)- ‘‘मला तुमची मुलगी पसंत आहे हो; पण एक सांगायला हवंच हं. माझा मुलगा ना नास्तिक आहे. त्याचा देवावर अजिबात विश्वास नाही.’’
मुलीची आई- ‘‘त्याची नका चिंता करू, एकदा लग्न होऊन तो माझ्या मुलीबरोबर राहू लागला की, आठ-दहा दिवसातच त्याला सारे देव आठवू लागतील.’’

तर तू काय करशील?

आई (बारा वर्षांच्या मुलीला) तू स्वयंपाक करायला शीक, वॉशिंग मशीन सुरू करायला शीक, घरकाम तुला आले पाहिजे.
मुलगी- का?
आई- तुझा पती, समजा, आजारी पडला किंवा दौऱ्यावर गेला, तर तू काय करशील?

Wednesday, November 24, 2010

रजनीकांत - THE BOSS

स्पायडरमन, सुपरमन, बॅटमन, जेम्स बॉन्ड, शक्तिमान, क्रिश हे सगळे रजनीकांतला भेटायला येतात तो दिवस कुठला?
?
?
?
?
...?
?
?
गुरु पोर्णिमा.

बाल विवाह

गुरुजी : तुम्हाला इतिहासातलं कुठलं पात्रं अजिबात आवडलं नाही?

मुलं : राजा राम मोहन राय

गुरुजी : का बरं?...................
...
मुलं : त्यांनीच तर बाल विवाहावर बंदी आणली होती ना...

रजनीकांतचा फोन

रजनीकांतचा फोन silent mode वर असतो, त्याला कॉल येतो, फोन vibrate होतो आणि टिव्हीवर ब्रेकिंग न्यूज येते

"आज शहरात भूकंपाचे धक्के जाणवले, रिश्टर स्केल वर त्याची तीव्रता अमकी तमकी होती".....

अजब प्रेम की गजब प्रेम कहाणी

डुक्कर आणि कोंबडी एकमेकांच्या प्रेमात पडतात. एक दिवस ते दोघेजण रंगात येतात आणि एकमेकांच चुंबन घेतात.
दुसरया दिवशी डुकर मरते, "बर्ड फ्लू" मुळे.
आणि कोबडी मरते "स्वाइन् फ्लू" मुळे.
यालाच म्हणतात "अजब प्रेम की गजब प्रेम कहाणी".....

Tuesday, November 23, 2010

रजनीकांत

एके दिवशी रजनीकांत मॉर्निंगवॉकला निघाला. दुपारी त्याला पोलिसांनी अटक केली.

का?

कारण चालत चालत तो पासपोर्ट-व्हिसाशिवाय अमेरिकेत पोहोचला होता.

Monday, November 22, 2010

सॉल्लिड

पोलिस : मॅडम, तुम्ही खूप बहादूर दिसताय. रात्री घरात घुसलेल्या चोराला तुम्ही काय सॉल्लिड बदडून काढलंत.

मिसेस गणपुले : बहादूर वगैरे काही नाही हो...मला काय माहित तो चोर आहे. मला वाटलं होतं की आमचे हे रात्री उशिरा घरी आले आहेत.
...............

मला काहीच लपवायचे नाही.

जॉर्ज बर्नार्ड शॉ मिश्कील उद्गाराबद्दल प्रसिद्ध होते. एकदा ते बाथरूममध्ये टबात उघडय़ाने आंघोळ करीत होते त्यांना भेटायला आणि मुलाखत घ्यायला काही पत्रकार आल्याचे त्यांच्या नोकरांनी सांगितले. आंघोळ अर्धवट टाकून उघडय़ा अंगानेच ते हॉलमध्ये आले आणि म्हणाले, ‘मला काहीच लपवायचे नाही. काय विचारायचे ते विचारा!’

Friday, November 19, 2010

अनुभव

कायद्याने तरुणाला मतदानाचा हक्क १८ वर्ष पूर्ण झाल्यावर दिलाय आणि लग्नासाठी वयोमर्यादा २१ आहे,

ह्यातून काय सिद्ध होत? - - - - - ...

एवढच कि देशाला सांभाळण्यापेक्षा बायकोला सांभाळायला जास्त अनुभव लागतो...:)