Saturday, January 17, 2009

फ्रेनीआजीचे बदाम

बसमध्ये तुडुंब गर्दी होती. विन्या प्रधान एका सीटवर बाहेरच्या बाजूला चेमटून बसला होता. त्याच्याशेजारी सत्तरीच्या घरातली फ्रेनीआजी उभी होती. तिने विन्याच्या खांद्यावर टकटक केले, तेव्हा विन्याला झोपेचे नाटक सोडून तिच्याकडे पाहावेच लागले. तिने त्याच्या हातात चार बदाम ठेवले आणि म्हणाली, ''खा बाळा, खा!'' विन्याने चवीचवीने बदाम खाल्ले आणि पुन्हा त्याचा 'डोळा लागला'. पुन्हा खांद्यावर टकटक झाल्यावरच तो उघडला. फ्रेनीआजीने पुन्हा त्याच्या हातात चार बदाम ठेवले आणि म्हणाली, ''खा बाळा, खा! तब्येतीला चांगले असतात बदाम.'' विन्याने पुन्हा बदाम मटकावले. असं आणखी दोनदा झाल्यावर विन्या म्हणाला, ''अहो आजी, असे बदाम वाटत का फिरताय? तुम्ही का नाही खात ते?'' तोंडाचं बोळकं रूंदावत फ्रेनीआजी म्हणाली, ''दात पडले माझे सगळे बाळा! चावणार कशी बदाम?'' '' अहो पण तुम्ही खाऊ शकत नसताना महागडे बदाम विकत घेता कशाला?'' हातातला बदामाच्या चॉकलेटांचा पुडा नाचवत आजी निरागसपणे म्हणाली, ''त्यांच्याभोवतीचं चॉकलेट तर चघळता येतंच ना मला!!!!!!!''

No comments: