Sunday, March 15, 2009

पोपट

एक म्हातारा माणूस एका मॉलमध्ये बेंचवर बसला होता. तेवढ्यात तिथे एक युवक येवून बसला. त्या युवकाचे केस कुठे पिवळे, कुठे हिरवे, कुठ गुलाबी तर कुठे जांभळे असे जागोजागी रंगविलेले होते. त्याच्या डोळ्याभोवती काळा रंगही लावला होता. तो म्हातारा त्या युवकाकडे एकटक पाहत होता. त्या म्हाताऱ्याला आपल्याकडे असे एकटक बघतांना पाहून तो युवक त्याला उद्दामपणे म्हणाला, '' हे म्हाताऱ्या ... असा काय पाहतोस?... तु तुझ्या जवानीत कधी अशी मस्ती केली नाही का?''

त्या म्हाताऱ्याने उत्तर दिले, '' हो केली होती ना... जेव्हा मी जवान होतो तेव्हा एकदा मी खुप पिलो होतो... तश्या पिलेल्या अवस्थेत मला एक पोपट भेटला... त्याला बघताच मी त्याच्या प्रेमात पडलो, आणि पुढेही बरच काही झालं...... मी विचार करीत होतो की तु त्या पोपटाचा आणि माझा मुलगा तर नाहीस ''

स्वर्गात क्रिकेट आहे का?

दोन म्हातारे बऱ्याच वर्षापासून अगदी जिवलग मित्र होते. दोघांचही वय आता जवळपास 90च्या दरम्यान असेल जेव्हा त्यातील एक जण खुप आजारी पडला. त्याचा दुसरा मित्र त्याला रोज भेटायला येत असे आणि ते रोज आपल्या मैत्रीच्या गप्पा करीत असत. त्यांना आता जवळपास कल्पना आली होती की जो बिमार पडला आहे तो थोड्याच दिवसांचा साथीदार आहे. एक दिवस त्याच्या मित्राने मृत्यूशय्येवर पडलेल्या मित्राला म्हटले, '' बघ जेव्हा तू मरशील माझ्यासाठी एक काम करशील का?''

''कोणतं?'' मृत्यूशय्येवर पडलेल्या मित्राने विचारले.

'' तू मेल्यानंतर मला स्वर्गात क्रिकेट आहे का ते सांगशिल का?'' दुसऱ्याने विचारले.

दोघंही क्रिकेट वेडे होते.

'' का नाही जरुर सांगेन की'' मृत्यूशय्येवर पडलेला मित्र म्हणाला.

आणि एकदोन दिवसातच तो बिमार पडलेला मित्र मरण पावला.

काही दिवसानंतर जो जिवंत म्हातारा मित्र होता त्याला झोपेत त्याच्या मेलेल्या मित्राचा आवाज एकू आला-

'' तुझ्यासाठी माझ्याकडे दोन बातम्या आहेत... एक वाईट आणि एक चांगली... चांगली बातमी ही आहे की स्वर्गात क्रिकेट आहे ... ''

''आणि वाईट बातमी?''

'' आणि वाईट बातमी ही आहे की तुला येत्या बुधवारच्या मॅचमधे बॉलींग करायची आहे''

सासुबाई - सुनबाई

मोलकरण घाई घाई घरात येत सुशीलाला म्हणाली, '' मालकीन तिकडे अनर्थ झाला आहे, आपल्या शेजारच्या तिनजणी मिळून तुमच्या सासुला बदड बदड बदडताहेत''

सुशिला मोलकरणीसोबत खाली आली आणि शांततेने तो तमाशा पाहू लागली. तेव्हा मोलकरणीने तिला विचारले, '' तुम्ही मदत नाही करणार?''

'' नाही... मला वाटतं तिघीजणीच काफी आहेत '' सुशीला म्हणाली.

Saturday, March 14, 2009

मुलांनो...

प्रोफेसर - मुलांनो, कधीही मद्य प्यायचे नाही, कधीही मांस खायचं नाही, कधीही मुलींना छेडायचं नाही आणि लक्षात ठेवा आपल्या देशासाठी आपला प्राण द्यायचा.

मुलं - हो सर, अशा जिन्यापेक्षा तर मरणं केव्हाही बेहत्तर.

Friday, March 6, 2009

Exact Date of Death

:My Uncle knew the Exact Date of His Death b4 a Month Itself.

Frnd:How it is?

Sar:The Judge tolld him.!