Sunday, March 15, 2009

स्वर्गात क्रिकेट आहे का?

दोन म्हातारे बऱ्याच वर्षापासून अगदी जिवलग मित्र होते. दोघांचही वय आता जवळपास 90च्या दरम्यान असेल जेव्हा त्यातील एक जण खुप आजारी पडला. त्याचा दुसरा मित्र त्याला रोज भेटायला येत असे आणि ते रोज आपल्या मैत्रीच्या गप्पा करीत असत. त्यांना आता जवळपास कल्पना आली होती की जो बिमार पडला आहे तो थोड्याच दिवसांचा साथीदार आहे. एक दिवस त्याच्या मित्राने मृत्यूशय्येवर पडलेल्या मित्राला म्हटले, '' बघ जेव्हा तू मरशील माझ्यासाठी एक काम करशील का?''

''कोणतं?'' मृत्यूशय्येवर पडलेल्या मित्राने विचारले.

'' तू मेल्यानंतर मला स्वर्गात क्रिकेट आहे का ते सांगशिल का?'' दुसऱ्याने विचारले.

दोघंही क्रिकेट वेडे होते.

'' का नाही जरुर सांगेन की'' मृत्यूशय्येवर पडलेला मित्र म्हणाला.

आणि एकदोन दिवसातच तो बिमार पडलेला मित्र मरण पावला.

काही दिवसानंतर जो जिवंत म्हातारा मित्र होता त्याला झोपेत त्याच्या मेलेल्या मित्राचा आवाज एकू आला-

'' तुझ्यासाठी माझ्याकडे दोन बातम्या आहेत... एक वाईट आणि एक चांगली... चांगली बातमी ही आहे की स्वर्गात क्रिकेट आहे ... ''

''आणि वाईट बातमी?''

'' आणि वाईट बातमी ही आहे की तुला येत्या बुधवारच्या मॅचमधे बॉलींग करायची आहे''

No comments: