Monday, February 22, 2010

मृत्यू अटळ गोष्ट

कीर्तनाच्या वेळी बुवांनी सांगितले. मृत्यू ही अटळ अशी गोष्ट आहे. या गावातील प्रत्येक माणूस केव्हा ना केव्हा तरी मरणार आहे. त्याचं बोलणं ऐकून कीर्तनाला जमलेले सारे श्रोते रडू लागले.
एका बाईने मोठमोठय़ाने हसायला सुरुवात केली! बुवांनी तिला विचारले असता ती म्हणाली, ‘मी या गावची नाही.’

बुद्धी

सदूने आपल्या वडिलांना विचारले, ‘बाबा, मला बुद्धी कोणाकडून मिळाली आईकडून की तुमच्याकडून? बाबा म्हणाले, नक्की तुला बुद्धी तुझ्या आईकडून मिळाली आहे; कारण माझी बुद्धी अजून माझ्याजवळ आहे.

SHAKIRA

Once in a jungle, a Tiger kills a Cow....................A Hippopotamus sees it ............................. Tiger pleads to the Hippo not to tell this in the court and keep it a secret................The Hippo refuses to do so.........................


TIGER : "Why man why ??" ................................

HIPPO : ..." Because once SHAKIRA AUNTY had said




'HIPS DON'T LIE' !!!!!!!!!!

Wednesday, February 17, 2010

टोपली - Hint

संता : माझ्या टोपलीत काय आहे हे तू सांगितलंस तर टोपलीतली सगळीच्या सगळी अंडी मी तुला देईन. किती अंडी आहेत, ते सांगितलंस तर आठच्या आठही अंडी देईन... आणि जर तू हे पण सांगितलंस ना की अंडी कुणाची आहेत तर कोंबडी पण तुला मिळेल.

बंता : (डोकं खाजवत) अरे पण... एखादी हिंट तर दे ना!!!

Monday, February 15, 2010

सेलिब्रेशन - Valentine day

एक मित्र : व्हॅलेंटाइन डेला काय करणार?


दुसरा मित्र : दिवसभर गर्लफ्रेण्डचा हात हातात घेऊन बसणार... नाही तर ती शॉपिंग करत बसेल.

स्वप्नाचा अर्थ? Nightmares

बायको : आज मला स्वप्न पडलं होतं की व्हॅलेंटाइन डेला तू मला मोत्यांचा हार भेट दिला आहेस. काय असेल या स्वप्नाचा अर्थ?


नवरा : ते तुला व्हॅलेंटाइन डेलाच कळेल.

व्हॅलेंटाइन डेला छान रॅप केलेलं एक गिफ्ट त्याने बायकोला दिलं. मोत्यांच्या हाराच्या उपेक्षेने उघडलं. त्यात एक पुस्तक होतं- 'स्वप्न आणि त्यांचे अर्थ'

पतंग

बाबूराव- ‘डॉक्टर, डॉक्टर, माझ्या अंगात वारं भरल्यासारखं झालंय. काही देता का?’
डॉक्टर- ‘खालच्या दुकानातून पतंग घ्या.’

एकही शब्द नाही - not a single word

कोर्टात जजने पोलीस ऑफिसरला विचारले, ‘तुम्ही जेव्हा आरोपीस अटक करावयास गेलात, तेव्हा तो काय म्हणाला.
पो.ऑ.- शिव्या वगैरे वगळून सांगू का सर?
जज- अर्थात.
पो.ऑ.- तो एकही शब्द बोलला नाही सर.

Thursday, February 11, 2010

रुमाल

एकदा गंगुबाई एक रुमाल खूप धुते. साबण लावून लावून धुते. कोपरान् कोपरा धुते आणि काय आश्चर्य...


धुवून झाल्याक्षणी रुमालाची घडी होते.

असं कसं ते?

कारण सोप्पाय,

रुमाल धुण्यासाठी ती 'घडी' डिटर्जंट वापरते ना.

काचेचे ग्लास

संता : अरे हे दुकानवाले वेडेच आहेत की.

बंता : का रे?

संता : अरे हे विकायला ठेवलेले काचेचे ग्लास नीट बघ. वरनं बंद आहेत. आता सांग यात लस्सी कशी बरं ओतायची.

बंता : खरंच की रे. आणि हे ग्लासेस खालून पोकळ ठेवले आहेत. आता लस्सी ग्लासमध्ये कशीबशी घातलीच... तरी त्याचा काय उपयोग?

तुमचा मुलगा करतो काय?

उसने जिस जिस जगह रखे कदम
हमने हर वो जमीन
चूम ली
और वौ बेवफा घर आ के बोले -
' काकू , तुमचा मुलगा माती खातो !!'

हेअरस्टाइल - hair style

दोन शिष्ट मैत्रिणी बोलत असतात.

पहिली : तुझी हेअरस्टाइल खूप छान आहे.

दुसरी : धन्यवाद.

पहिली : ही स्टाइल बदलू नको. ती परत येईल.

‘वन वे’ - one way

‘वन वे’ रस्त्यावरून गाडी घेऊन जाताना ट्रॅफिक पोलिसाने रमणला पकडले.
‘हा वन वे आहे हे तुला माहीत नाही का?’ त्याने विचारले. ‘माहीत आहे’, रमणने उत्तर दिले, ‘मी पण रस्त्याचा ‘वन वे’ वापर करतोय. या रस्त्याने मी परत येणार नाही.’

Tuesday, February 2, 2010

काळजी

एका सैनिकाची पत्नी त्याची खूप काळजी करीत असे. एकदा या व्यवहारी व काटकसरी पत्नीने पाठविलेले पार्सल सैनिकाला मिळाले. त्यासोबतच्या चिठ्ठीत लिहिले होते- जर हे मिठाईचे पार्सल सतरा जानेवारीनंतर मिळाले, तर सर्व मिठाई शत्रूंना देऊन टाका.

बेचव जेवण

पत्नीच्या रोजच्या बेचव जेवणाला कंटाळून अनिल वैतागाने म्हणाला, ‘हे बघ अनघा, तू जरा चार-आठ दिवस माहेरी जा व आईकडून जरा शिकून ये.’ अनघा मान डोलावत म्हणाली, ‘अय्या, माझे बाबा पण आईला हेच सांगतात.’

कमाल का मशिन

संताचा आज पन्नासावा वाढदिवस होता. सकाळपासून मित्रांना जमवून अळट मधून वारंवार पैसे काढून तो मौजमजा करत होता.
पैसे संपल्यावर रात्री ११ वाजता झोकांडे खात मित्रांच्या आधाराने पुन्हा एकदा अळट मशिनसमोर उभा राहिला.
कार्ड आत सरकवताच स्क्रीनवरअक्षरे आली. kkSorry You have crossed todays limit.ll ते वाचून संता ओरडलाच, ‘ओये कमाल का मशिन है! मै कितना पिया उसने बराबर पहचाना.

बायको

बंडोपंत : साहेब… जरा कम्प्लेन्ट लिहून घ्या ना. काल पासून माझी बायको घरी आली नाहीय.

साहेब : अहो हे पोस्ट ऑफीस आहे. पोलिस स्टेशन नाही.

बंडोपंत : काय करू हो. कालपासून एवढा आनंद झालाय की मी काय करतोय, कुठे जातोय.. काहीच कळत नाहीय.