Thursday, March 18, 2010

अदभूत नजारा

सर्कसच्या रिंगणात, एक सुंदर स्त्री एका सिंहाला त्याच्या पिंजऱ्यात जावून किस करीत होती. सर्कस पहायला गेलेले सर्व प्रेक्षक श्वास रोखून तो नजारा बघत होते. पिंजऱ्याभोवती गोल चक्कर मारता मारता रिंग मास्टरने

प्रेक्षकांना विचारले, '' बघा हा अदभूत नजारा .. तूम्ही कधी बघितला नसेल ... आणि भविष्यात कधी बघणारही नाही...''

मग अचानक प्रेक्षंकाकडे वळून रिंगमास्टर म्हणाला, '' काय प्रेक्षकातले कुणी असं करु शकते?''


प्रेक्षकातून एक सरदार उभा राहाला आणि ओरडून म्हणाला, '' हो... मी करु शकतो... पण आधी त्या मुर्ख सिंहाला पिंजऱ्याच्या बाहेर काढा''

No comments: