Monday, April 26, 2010

चप्पल

गंपूला एक मुलीने स्वप्नात चप्पल मारली. पुढचा आठवडाभर गंपू बँकेतच गेला नाही. का?


बँकेचं बोधवाक्य होतं- 'हम आपके सपनों को साकार करते है.'

‘काय करता हो?’

बसमध्ये अचानक एका तरुणाचा हात एका तरुणीच्या खांद्याला लागला. तशी ती ओरडून म्हणाली, ‘काय करता हो?’
‘पुणे युनिव्हर्सिटीत’ एम.ए. करतोय,’ तरुण म्हणाला.

Wednesday, April 21, 2010

मनपा शाळां

मनपा शाळांमध्ये वार्षिक परीक्षा सुरू होती. या काळात बहुतेक शाळांना बी.ओ., ए.ओ. यांसारखे वरिष्ठ अधिकारी भेट देत असतात. मनपाच्या एका तीन मजली शालेय इमारतीत परळ शाळा नं. १, परळ शाळा नं. २ व परळ शाळा नं. ३ अशा तीन मराठी शाळा होत्या. तळमजल्यावर वॉचमन बसला होता. जिना चढता चढता शाळा नं. ३ च्या मुख्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले. ते त्याला पाहून म्हणाले, ‘‘शाळेत कुणीही अधिकारी आले तरी मला येऊन सांग.’’
थोडय़ा वेळाने परीक्षेचा पेपर सुरू झाला. वॉचमन घाईघाईने तीन जिने चढून शाळा नं. ३ च्या मुख्यांजवळ आला आणि धापा टाकत म्हणाला, ‘‘सर आपले बी.ओ. एक नंबरला बसले आहेत आणि बी.ओ. दोन नंबरला बसले आहेत.’’

रिझल्ट

रामभाऊ, आपल्या मुलाचे केस धरून रागारागाने त्याला धोपटत होते. त्या आवाजाने शेजारचे गंपूनाना गणपुले बाहेर आले आणि त्यांनी विचारले, ‘‘रामभाऊ, का हो याला मारता? काय केलं हो याने?’’
अहो गंपूनाना, ‘‘याचा उद्या रिझल्ट आहे आणि मी उद्या गावी जातोय, पण याला आज कशासाठी मारताय?’’ गंपूनानांनी विचारले.
‘‘याचा रिझल्ट काय लागणार, याची मला पूर्ण कल्पना आहे. म्हणजे मग गावी गेल्यावर तेवढीच मला हुरहुर लागायला नको.’’

खात्री?

‘‘प्रत्येक पत्राच्या शेवटी बायका ‘ताजा कलम’ का लिहितात हेच समजत नाही!’’ अनंतराव आपल्या पत्नीला म्हणाले.
‘‘काहीतरीच बोलता तुम्ही!’’ उषाताई म्हणाल्या, ‘‘आता मी तुम्हाला पत्र लिहीन, त्यात ताजा कलम असतो का पाहा!’’
दुसऱ्या दिवशी अनंतराव ऑफिसात गेले असता त्यांना उषाताईंची चिठ्ठी आली. शेवटी सही करून झाल्यावर उषाताईंनी लिहिले होते, ‘‘ता.क. आता तरी झाली ना खात्री?’’

Tuesday, April 13, 2010

करंट अफेअर!

दोन इलेक्ट्रीक केबल्समध्ये प्रेमप्रकरण सुरू झालं तर त्याला आपण काय म्हणू?

....

करंट अफेअर!

ड्रेसिंग टेबल

पत्नी : गेल्या वाढदिवसाला तू मला लोखंडी ड्रेसिंग टेबल दिलं होतंस. या वर्षी?
पती : यावर्षी त्यात करंट सोडणार आहे!

आनंद

पत्नी : तो बघ तो माणूस जो दारू पितोय ना, त्याने पाच वर्षांपूवीर् मला लग्नाची मागणी घातली होती.

पती : वा! बघ बघ, अजून सेलिब्रेट करतोय!

प्रेमात पडल्यापासून

गणपतराव : तुमचं कुत्रं तर पार वाघावानी दिसतंय की राव...काय खिलवता काय त्येला?

चंपकराव : अवो वाघचं हाय त्यो...पर येका वाघिणीच्या प्रेमात पडल्यापासून अगदी कुत्र्यावानी कराया लागलाय बगा...

Monday, April 12, 2010

वरून - Varun

सकाळीच विशूच्या मित्राचा फोन आला. विशू काम करीत होता म्हणून विशूच्या वडिलांनी फोन उचलला. पलीकडून आवाज आला, ‘मी वरून बोलतोय.’ विशूच्या वडिलांनी उत्तर दिलं, ‘मी खालून बोलतोय!’

Saturday, April 3, 2010

मोठ्ठा हो!

'बाबा, मी आईला न सांगता घराबाहेर जाण्याएवढा मोठा कधी होणार?'


'मी पण एवढा मोठा झालो नाहीये अजून!'

दोन प्रेमी जीव

गार्डनमध्ये दोन प्रेमी जीव निवांत बसले होते. एकमेकांच्या डोळ्यांत पाहत एका बाजूला वेफर्स खाणं सुरू होतं.

मुलगी : हे हिरवंगार गार्डन, ही रम्य संध्याकाळ, फक्त तू आणि मी...डिअर, आत्ता या क्षणी तुला काय वाटतंय?

मुलगा : (थोडा वेळ थांबून) खा...सगळे वेफर्स तूच खा...हावरट कुठली.

दहशत

'मला दहशतवाद्यांची भीती वाटते!'


'मला नाही वाटत. माझं दोन वर्षांपूवीर्च लग्न झालंय!'

तक्रार

टीनएजर होऊ घातलेल्या एका लहानग्याची मी शिट्टी मारली तर आई म्हणते मुलगा बिघडला,

आणि कुकरने शिट्टी नाही मारली तर म्हणते कुकर बिघडला!

गणित

शिक्षिका : गंपू, दोन अधिक दोन चार. आता सांग चार अधिक चार किती?


गंपू : हा... तुम्हाला सोपं गणित.. मला कठीण गणित..