Friday, September 10, 2010

भडंग

बंड्या आणि त्याची गर्लफ्रेंड एकदा नदी काठावर निवांत गप्पा मारत भडंग खात बसले होते.
बंड्याची गर्लफ्रेंड त्याला म्हणाली,
"तुला आठवतंय? आपण मागच्या आठवड्यात इथे आलो होतो तेव्हा काय मस्त पाऊस पडत होता...आपण अगदी चिंब भिजलो होतो. मी सारखी शिंकत होते तर तुझाच जीव कासावीस झाला होता. तुझा जाकेट तू मला घालायला दिलंस, रुमाल काढून दिलास, मेडिकल मधून व्हिक्स आणतो म्हणालास...मला खूप दाटून आलं माहितेय! किती प्रेम करतोस रे माझ्यावर?"

बंड्या काहीच न बोलता तिच्याकडे एकटक पाहत राहिला.
ती थोडीशी लाजली.
"असं एकटक का पाहतो आहेस?" तिने दाटलेल्या आवाजात विचारलं. तिचे डोळे त्याच्या डोळ्यात सामावलेलं तिच्यावरचं प्रेम शोधत होते.

बंड्या क्षणभर काहीच बोलला नाही. थोड्या वेळाने हळू आवाजात म्हणाला....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"हावरे, किती खाशील? मला पण दे की थोडं भडंग..."

No comments: