Monday, October 18, 2010

प्रामाणिक नवरा

मेठजलानी वकील साक्षीदाराची उलटतपासणी घेत होते.
‘‘बाई, तुम्ही आरोपीच्या पत्नी आहात ना?’’
‘‘होय.’’
‘‘आरोपी खोटय़ा सह्या करून दुसऱ्याच्या खात्यावरचे चेक वटवतो, हे तुम्हाला माहीत आहे?’’
‘‘आहे.’’
‘‘लग्नाच्या आधीपासून माहीत होतं?’’
‘‘होय.’’
‘‘मग, अशा लबाड, खोटय़ा माणसाशी तुम्ही लग्न केलंतच कसं?’’
‘‘काय करणार? माझं लग्नाचं वय तसं उलटून गेलं होतं. किती वेळ वाट पाहणार? माझ्यापुढं निवडीसाठी दोनच स्थळं होती. एक हा नवरा आणि दुसरं स्थळ एका वकिलाचं होतं. मी त्यातल्या त्यात अधिक प्रामाणिक नवरा निवडला!’’

No comments: