घनदाट जंगलात सगळे प्राणी-पक्षी गुण्या-गोविंदाने राहत असतात. एक दिवस, हत्तीदादा सगळ्यांना एकत्र बोलवतात. म्हणतात, मित्रांनो, उद्या एकादशी आहे. आपण उपास करू या. हत्तीदादाचं म्हणणं सगळ्यांना पटतं. सगळे उपास करतात. संध्याकाळी गावाकडच्या विठूमाऊलीच्या दर्शनाला जायचं ठरतं. सगळे प्राणी जातात, पण कोंबडी त्यात नसते.
कोंबडी : तुम्ही जा बाई, मी नाही येत तुमच्याबरोबर.
हत्तीदादा : अगं, आपण सगळ्यांच्या भल्यासाठी जातोय. चल तूही...
कोंबडी : म्हणूनच येत नाही मी. अहो, उपासाला कोंबडी चालत नाही ना!
No comments:
Post a Comment