Monday, June 28, 2010

दोन रुपयाची नोट

बसमध्ये एका लहान मुलाला कंडक्टरने तिकीटासाठी दीड रुपया मागितला. मग तो रडू लागला. रडण्याचे कारण विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘माझ्या खिशात दोन रुपयाची नोट होती ती हरवलीय. आता तुम्हाला मी पैसे कुठून देऊ?’’
त्या मुलाची कंडक्टरला दया आली. ‘रडू नका, हे घे’ म्हणून त्याने मुलाच्या हाती तिकीट ठेवले, पण मुलाचे रडणे थांबेना, म्हणून कंडक्टरने ‘पुन्हा का रडतोस?’ म्हणून विचारले असता मुलगा म्हणाला, ‘तिकीट दीड रुपयाचे आहे, पण पन्नास पैसे कुठे आहेत?’’

Monday, June 21, 2010

पैज

अमेरिकन, चिनी आणि भारतीय रेल्वेने प्रवास करीत होते. त्या तिघांत पैज लागली की, आपल्याकडील अशी वस्तू गाडीबाहेर फेकायची, की इतर दोघांनाही ती फेकता आली पाहिजे.
प्रथम अमेरिकन माणसाने आपला कोट फेकला. इतर दोघांनीही आपापले कोट बाहेर फेकले. नंतर चिनी माणसाने आपल्या हातातील घडय़ाळ बाहेर फेकले. क्षणाचाही विचार न करता अमेरिकन आणि भारतीयाने आपल्या हातातील घडय़ाळे बाहेर भिरकावली.
आता भारतीयाची पाळी होती. त्याने आपल्या तोंडात बोटे घालून दातांची कवळी बाहेर काढली आणि बाहेर फेकली आणि पैज जिंकली.

Friday, June 18, 2010

टाळा...

पेशंट : डॉक्टर, माझा हात दोन ठिकाणी मोडलाय!!


डॉक्टर : ओके... या दोन ठिकाणी जाणं शक्यतो टाळा...

Tuesday, June 15, 2010

शेअर दलाल

जव्हेरीभाई शेअर दलाल यांना ताप आला म्हणून ते ताबडतोब दवाखान्यात आले. थर्मामीटर लावून पाहिले. परिचारिका म्हणाली, ‘‘आपण आला तेव्हा १०२ अंश ताप होता. नंतर १०३ अंश.’’
जव्हेरीभाई अर्धवट ग्लानीत म्हणाले, ‘‘१०५ अंश झाल्यावर सर्व विकून टाका.’’

२१ तोफांची सलामी

खंडू - तुला माहीत आहे, मी जन्मलो तेव्हा २१ तोफांची सलामी दिली गेली होती.
बंडू - आश्चर्य आहे! पण मग सगळ्यांचाच नेम कसा काय चुकला?

Friday, June 11, 2010

chickens eggs

Q. Why don't chickens like people ?

A. They beat eggs !

Innocence at its best

A kid, after being beaten by his mom (sitting sadly)


Dad : What happened son?




Kid : Dad, I cant adjust with your wife anymore!
I want my own wife.

Wednesday, June 2, 2010

रामदेव बाबा

९९ वर्षांचे आजोबा स्वर्गात पोहोचले आणि स्वर्गलोकीचा थाटमाट आणि अप्सरा बघून खुश झाले. मग थोडे हळहळले, 'अर्रर्र... त्या रामदेव बाबाच्या नादाला लागलो नसतो, तर ३० वषेर् आधीच इथे आलो असतो...'

पर्वाच नाहीय...

चुंचू आणि चंपी हातात हात घालून बागेत बसले असतात.

चंपी : तू माझ्याशी बोलू नकोस जा...

चुंचू : का गं, काय झालं?

चंपी : तुला की नाई माझी जरा पण पर्वाच नाहीय...

चुंचू : हात्तिच्या एवढंच ना. जानेमन प्यार करनेवाले किसी की परवाह नहीं करते.