अमेरिकन, चिनी आणि भारतीय रेल्वेने प्रवास करीत होते. त्या तिघांत पैज लागली की, आपल्याकडील अशी वस्तू गाडीबाहेर फेकायची, की इतर दोघांनाही ती फेकता आली पाहिजे.
प्रथम अमेरिकन माणसाने आपला कोट फेकला. इतर दोघांनीही आपापले कोट बाहेर फेकले. नंतर चिनी माणसाने आपल्या हातातील घडय़ाळ बाहेर फेकले. क्षणाचाही विचार न करता अमेरिकन आणि भारतीयाने आपल्या हातातील घडय़ाळे बाहेर भिरकावली.
आता भारतीयाची पाळी होती. त्याने आपल्या तोंडात बोटे घालून दातांची कवळी बाहेर काढली आणि बाहेर फेकली आणि पैज जिंकली.
No comments:
Post a Comment