मराठी भाषा वळवावी तशी वाकते म्हणतात. शब्द तेच, पण संदर्भ बदलले की त्याला कसा वेगळा अर्थ प्राप्त होतो, त्याचे वेगवेगळ्या क्षेत्रांतील हे गमतीदार प्रसंग.
प्रसंग आहे एका जाहिरातीतला. (याला संदर्भ : मराठी बोलणाऱ्या प्रत्येक घरातील लहान मूल ‘शी’ झाली की ओरडून आईला सांगतं ‘आई, झालं.’)
जाहिरात आहे भांडी घासण्याच्या साबणाची. एक मोठ्ठी कढई घासल्यानंतर नोकर मालकाला म्हणतो ‘‘मालऽऽक झालं.’’
मग मालक त्याला म्हणतो ‘‘धुवून बघ.’’ जाहिरात करणारा माणूस हॉटेलमधील एका स्त्रीला विनंती करतो ‘मॅडम जरा पाहता का स्वच्छ झालंय की नाही?’’
No comments:
Post a Comment