दिवाळीच्या फराळाचे स्वयंपाकघरात चालले असता राधाबाईने मुलास आगगाडी खेळावयास देऊन बाहेर जाण्यास सांगितले, पण थोडय़ाच वेळाने चिरंजीवांची स्वारी आगगाडी ओढीत-ओढीत स्वयंपाकघराच्या दाराकडे येऊ लागली तेव्हा..
राधाबाई- ‘‘आता इकडे कशाला आणली आगगाडी? जा, तिकडे बाहेर खेळ जा.’’
मुलगा- ‘‘बाहेर कोठे जा? या स्टेशनावर आमची आगगाडी उतारुंचा फराळ होईपर्यंत अर्धा तास थांबणार आहे.’’
No comments:
Post a Comment