Thursday, August 19, 2010

लॉटरीचं तिकीट

स्थळ : सदाशिव पेठ, पुणे.


आपटे : काय, बापट आज अगदी खुशीत आहेस.

बापट : अरे म्हणजे काय, असणारच. त्या गोगटेला लॉटरीचं तिकीट लागलंय.

आपटे : काय सांगतोस? मग त्यात तू इतकं खुश होण्यासारखं काय आहे?

बापट : अरे त्याला ते लॉटरीचं तिकीटच सापडत नाहीये.

Tuesday, August 17, 2010

Sabji

banti sabji lene gaya.

Sabji wala sabji par pani chidk raha tha.

banti intzar karta raha.Jab kafi der baad bola-

Agar inhe hosh aa gya ho to 1 kilo de

Sorry Ki Spelling

Old Man 1 Ladki Se Takrya
OLD MAN-Sorry
Grl-Stupid
Tabi 1 Ladka us Se Takrya
Ladka-Sorry
Grl-Its Ok
Old Man-Meri Sorry Ki Spelling Galat Thi kya

आलात ना माझे पाय धरायला?

रंगराव आणि कमळाबाई या नवरा-बायकोचं कडाक्याचं भांडण होतं. एकमेकांचं तोंड बघायचं नाही असं ठरवून दोघं झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी-सकाळीच रंगराव हातात दुधाचा कप घेऊन बायकोकडे येतात.

कमळाबाई : (ठसक्यात) अरे वा...शेवटी आलात ना माझे पाय धरायला?

रंगराव : तसं नाही गं...पण आज नागपंचमी आहे ना.

Wednesday, August 11, 2010

रस्ते सुरक्षा सप्ताह

ट्रॅफिक पोलिसांनी कार थांबवली. 'अभिनंदन, रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू आहे... तुम्ही सीटबेल्ट लावून गाडी चालवत आहात, म्हणून तुम्हाला ५००० रु.चं बक्ष
िस मिळतंय. या रकमेचं तुम्ही काय कराल?'

कार ड्रायव्हर: मी त्यातून माझं ड्रायव्हिंग लायसन्स बनवून घेईन.

ड्रायव्हरची आई (मागच्या सीटवरून): त्याचं काही एक ऐकू नका.. दारू पिऊन तो काय वाट्टेल ते बोलतो...

ड्रायव्हरचे बाबा: मला वाटलंच होतं... चोरीच्या गाडीतून आपण जास्त लांब जाऊ शकणार नाही...

तेवढ्यात डिकीतून आवाज आला: भाई, आपण बॉर्डर पार केली का?

Tuesday, August 10, 2010

‘‘मालऽऽक झालं.’’

मराठी भाषा वळवावी तशी वाकते म्हणतात. शब्द तेच, पण संदर्भ बदलले की त्याला कसा वेगळा अर्थ प्राप्त होतो, त्याचे वेगवेगळ्या क्षेत्रांतील हे गमतीदार प्रसंग.

प्रसंग आहे एका जाहिरातीतला. (याला संदर्भ : मराठी बोलणाऱ्या प्रत्येक घरातील लहान मूल ‘शी’ झाली की ओरडून आईला सांगतं ‘आई, झालं.’)
जाहिरात आहे भांडी घासण्याच्या साबणाची. एक मोठ्ठी कढई घासल्यानंतर नोकर मालकाला म्हणतो ‘‘मालऽऽक झालं.’’
मग मालक त्याला म्हणतो ‘‘धुवून बघ.’’ जाहिरात करणारा माणूस हॉटेलमधील एका स्त्रीला विनंती करतो ‘मॅडम जरा पाहता का स्वच्छ झालंय की नाही?’’

Monday, August 9, 2010

शाळेत का नाही गेलास?

हवालदार- ‘‘बाळ नंदू तुझं १६ वर्षांचं वय, शाळेत का नाही गेलास? हे वाईट धंदे सोडून दे.’’
नंदू- साहेब एकदा कुलुप तोडून शाळेत गेलो होतो. पण काय सर्व पुस्तक, पुस्तकं वाचून का पोट भरतात? एक दमडी मिळाली नाही, तेव्हा त्या वाईट मार्गाला गेलो नाही.

जेवायला काय आहे?

पती : (फोनवरून) जेवायला काय आहे?


पत्नी : (फणकाऱ्याने) विष!

पती : तू झोप जेवून... मला घरी यायला उशीर होईल.

Wednesday, August 4, 2010

वॉचमन

माधवराव नव्यानेच एका अपार्टमेंटमध्ये राहायला आले होते. काही दिवसांनंतर एक तरुण त्यांच्याकडे येऊन म्हणाला, ‘‘आपण नव्यानेच इथे राहायला आला आहात.’’ आपल्याला भेटून आनंद झाला; पण आपण रात्री जरा कमी घोरत जा ना, माझी झोपमोड होते हो. माधवरावांनी विचारले, ‘‘आपण कोण?’’ उत्तर मिळाले, ‘‘मी या अपार्टमेंटचा नाइट वॉचमन आहे.

टॅक्सी

बंडोपंत- ‘‘ही काय टॅक्सी आहे. बसावयास धड सीट नाही. दरवाजे लागत नाही. दिवे लागत नाही. हार्न नाही. त्यापेक्षा चालत जातो. तू टॅक्सी थांबव.
टॅक्सी ड्रायव्हर- ‘‘थांबवू कशी? या गाडीला ब्रेक नाही.’’