Sunday, September 27, 2009

बाळाचा पापा कोण घेईल

नवीनच कामावर लागलेल्या अगदी तरुण कामवालीला प्रोफेसरीण बाई सांगत होत्या, ‘‘अगं ए, ऐक मी काय म्हणते ते. आज कॉलेजमधून यायला मला वेळ लागेल. बाळाला बाबागाडीतून समोरच्या बागेत घेऊन जा. आणि हो बाळाचा पापा कुणालाही घेऊ देऊ नकोस.’’
‘‘अहो, मी असताना बाळाचा पापा कोण घेईल!’’ आत्मविश्वासाने कामवाली बोलली.

No comments: