Friday, December 18, 2009

देवदूत

एक गृहस्थ रस्त्यातून चालत असताना आवाज आला. ‘थांब पुढे पाऊल टाकू नकोस, वीट तुझ्या अंगावर पडेल. तो थांबला आणि खरोखरच एक वीट त्याच्या पुढय़ात पडली. तो रस्ता ओलांडत असताना पुन्हा आवाज आला. थांब एकाच जागी उभा राहा तू हललास तर मोटार तुझ्या अंगावरून जाईल. तो पटकन स्तब्ध उभा राहिला आणि त्याचक्षणी एक गाडी वेगाने त्याला चाटून गेली न राहवून त्या गृहस्थाने विचारले सांग तू कोण आहेस? उत्तर आले, मी देवदूत आहे आणि तुझे रक्षण करण्यासाठी आलो आहे. हताश होऊन तो गृहस्थ विचारता झाला. ‘माझे लग्न होताना तू कोठे होतास?’

No comments: