धीर खेडेगावात आपल्या मामाकडे गेला होता. गाव पाहून झाल्यावर त्याने विचारले, ‘‘तुमच्या गावात कोणीच आजारी पडत नाही, असं ऐकलंय्, ते खरं आहे का? पण हे कसं शक्य आहे?’’
‘‘का नाही’’ मामा उत्तरले, ‘‘आमच्या गावात एकच डॉक्टर आहे. तो तिरसट आणि भांडकुदळ आहे. सर्वच गिऱ्हाईकांशी तो तुच्छतेने बोलतो. म्हणून गावकऱ्यांनी असं ठरविलंय्, उगीच आजारी पडून त्याला धंदा मिळू द्यायचा नाही, म्हणजे तो आपोआप वठणीवर येईल. म्हणून आम्ही गावातले सारे निरोगी राहतो.’’
No comments:
Post a Comment