सासू-सुनेचा जोरदार वाद चालला होता. कोणताही पक्ष मागे हटण्यास तयार नव्हता. सासरेबुवा वर्तमानपत्रात डोके खुपसून बसले होते. वैतागलेल्या मधूने पत्नीला बाजूला घेऊन सांगितले. ‘हे बघ, उगाच वाद वाढवू नकोस, आई अजून फार तर एक-दोन वर्षांत आटपेल, कशाला वाईटपणा घेतेस.’ थोडय़ा वेळाने मधूने आईला सांगितले, ‘आई, तुझे आता वय झाले आहे. विनाकारण वाद घातला नाहीस तर आणखी पंधरा-वीस वर्षे आरामात जगशील’ सासू-सुनेचे वाद नंतर कधीही झाले नाहीत.
No comments:
Post a Comment