Thursday, July 16, 2009

आपल्या राज्यात किती कावळे असतील?

एकदा अकबर बादशहा राजवाड्याच्या खिडकी जवळ बसलेले असतात.
खिडकी बाहेर कावळ्याचा काव-काव चालु असतो. तेव्हा तेथे बिरबल येतो.
अकबर बादशहा त्याला विचारतात- '' आपल्या राज्यात किती कावळे असतील?''
बिरबल विचार करुन म्हणतो.- १००००.......
त्यावर अकबर बादशहा त्याला म्हणतात ''जर जास्त असतील किंवा कमी असतील तर?''......
त्यावर बिरबल म्हणतो.- ''जास्त असतील तर दुसऱ्या राज्यातील कावळे आपल्या राज्यात फ़िरायला आले असतील,
आणि कमी असतील तर आपल्या राज्यातील कावळे दुसऱ्या राज्यात फ़िरायला गेले असतील.
''ह्या बिरबल च्या उत्तराने बादशहा त्याच्यावर खुश झाला.

1 comment:

Unknown said...

rajyat kawale kiti aahe he wicharle . naki aaplya rjyatale kawale kuthe gele aani dusarya rajyatun kiti aale he wicharle