एक बाई आपल्या कुत्र्याला दुध पिण्याकरिता स्टेनलेस स्टीलची थाळी विकत घ्यावी, म्हणुन दुकानात गेल्या. दुकानदाराने थाळी बांधून देतांना विचारले की, त्यावर कुत्र्याकरीता अशी अक्षरे टाकून देऊ का?
बाई उत्तरल्या, " त्याची जरूरी नाही. कारण आमचे हे दूध पीत नाहीत आणि कुत्र्याला वाचता येत नाही."
No comments:
Post a Comment