Wednesday, August 5, 2009

व्हिस्की

एक गृहस्थ दात काढण्यासाठी गेले होते. पण डॉक्टरसमोरच्या खुर्चीवर बसताच त्याला भीती वाटू लागली. तो थरथरायला लागला.
डॉक्टरला त्याची दया आली, त्यांनी त्यास थोडी व्हिस्की दिली. तरीही गृहस्थाची भीती कमी होईना. तेव्हा डॉक्टरांनी त्याला आणखी व्हिस्की दिली.
मग विचारलं, ‘आता कसं वाटतंय?’
गृहस्थ ताडकन खुर्चीवरून उठून म्हणाला, ‘माझ्या दाताला हात लावायची कुणाची हिम्मत आहे?’

No comments: