Wednesday, August 5, 2009

घडय़ाळ

त्यानं तिला नवीन घडय़ाळ दाखवलं. आपल्या बेकार प्रियकराला नवीन घडय़ाळ घेण्याइतके पैसे कोठून मिळाले याचं आश्चर्य करीत तिनं विचारलं, ‘बगाराम तुला हे घडय़ाळ कुठे मिळालं!’ ‘पळण्याच्या शर्यतीत मी पहिला आलो ना!’ बगाराम छाती फुगवून म्हणाला.
‘पण दुसरा नंबर कुणाचा आला?’ तिने पुन्हा विचारलं.
‘पोलिसाचा आणि तिसरा या घडय़ाळाच्या मालकाचा!’ बगारामनं शांतपणानं उत्तर दिलं.

No comments: