Thursday, February 5, 2009

ओ बिरबल!

भारत-पाकची मॅच असते. एका सरदारजीने सगळ्यात महागड्या पॅवेलियनचं तिकीट काढलेलं असतं. पण त्याला घरून निघायला उशीर होतो. बसस्टॉपवर बसची बराच वेळ वाट पाहिल्यावर अखेरीस बस येते. बसमधे चढणार एवढ्यात मागून कोणीतरी हाक मारतं, 'ओए बिरबल!'
तो वैतागून मागे बघतो. तर मागे कोणीच नाही. आणि त्याची ती बस चुकते.
स्वत:शीच पुटपुटत तो टॅक्सीत बसतो. प्रचंड ट्राफिकमधून एकदाचा वानखडेला पोहोचल्यावर रस्ता क्रॉस करायलाही त्याला संधी मिळत नाही. शेवटी सिग्नल पडतो आणि तो रस्ता क्रॉस करणार... एवढ्यात पुन्हा हाक, 'ओए बिरबल!'
तो पुन्हा वैतागून मागे बघतो. मागे कोणीच नाही. दुदैर्वाने तेवढ्यात ट्राफिक सुरू होतो आणि त्याला वाट पाहत उभं राहावं लागतं.
शेवटी कसाबसा स्टेडियमवर पोहोचतो. शेवटच्या पाच ओवर्स राहिल्या असतात. सामना एकदम अटीतटीचा झालेला असतो. शेवटचा बॉल... शेवटची रन, आता कोण जिंकणार? डोळ्यात प्राण आणून पाहत असतानाच, पुन्हा मागून हाक येते, 'ओए बिरबल.'
कोण हाक मारतंय, ते पाहण्यासाठी वळून बघतो आणि तो ऐतिहासिक शॉट 'याचि देही' पाहायची संधी हुकते.
चरफडत तो घरी जायला निघतो. घरी पोहोचतो. चावीने दरवाजा उघडणार... एवढ्यात पुन्हा तीच हाक, 'ओए बिरबल.'
आता मात्र त्याचा तीळपापड उडतो. रागाने मोठ्याने ओरडून तो म्हणतो...
साले कौन हे बे... मेरा नाम बिरबल नही बलबीर है बलबीर!

No comments: