Monday, February 16, 2009

शुभ चिंतणारी देवता

एक दिवस बंडू विमनस्क अवस्थेत रस्ता क्रॉस करत असतो. तेवढ्यात एक आवाज येतो. थांब... एक पाऊल जरी पुढे टाकलंस तर घात होईल. बंडू आहे तिथेच थबकतो. त्याक्षणी पुढच्या पावलावर वीज पडते. आणि बंडूचा जीव थोडक्यात वाचतो.

दुसऱ्या दिवशी बंडू परत रस्त्याने जात असताना आवाज येतो... थांब... एक पाऊल जरी पुढे टाकलंस तर घात होईल. बंडू पुन्हा थबकतो.

त्याच्या पुढच्या पावलावर एका इमारतीची तुळई कोसळून खाली पडते. आणि त्याचा जीव थोडक्यात वाचतो.

बंडू : तू आहेस तरी कोण?

आवाज : मी तुझं शुभ चिंतणारी देवता आहे बाळा... तुझा घात होत असताना, तुला कायम तुला माझा आवाज ऐकू येतो समजलं?

बंडू : नाही, हे शक्य नाही. तू जर माझं खरोखरच शुभ चिंतणारी देवता असलीस तर माझ्या लग्नाच्या वेळी का नाही मला तुझा आवाज आला?

No comments: