Saturday, February 14, 2009

मालतीला मध्यरात्री अचानक जाग येते आणि शेजारी पहाते तर तिचा नवरा माधव जागेवर नाही. ती त्याला शोधत शोधत स्वयंपाकघरात येते. तिथे माधव एका खुर्चीवर बसून गंभीर मुद्रेने काहीतरी विचार करताना तिला दिसतो.
मालती: "काय झाल माधव ? एवढ्या रात्री काय विचार करत आहेस ? काही चिंता आहे का तुला ?"
माधव: " तुला आठवतय , आपण जेव्हा नुकतेच एकत्र फिरायला लागलो होतो आणि तू फक्त १८ वर्षांची होतीस."
मालती: "हो. आठवतय की."
माधव: " तुला आठवतय तुझ्या बाबांनी आपल्याला बागेत पकडल होतं ?"
मालती: "हो. आठवतय ना".
मालती आता शेजारच्या खुर्चीत बसते.
माधव: " आणि मग त्यांनी माझ्यावर बंदूक रोखली आणि म्हणाले की, एकतर माझ्या मुलीशी लग्न कर नाहीतर मी तुला २० वर्ष तुरूंगात धाडीन."
मालती : "हो रे! आठवतय. पण आत्ता का विचारतो आहेस हे सगळं ? "
माधव (उदास स्वरात) : "अग थोडं धाडस केल असत तर आज मी आज मुक्त झालो असतो ग!"

No comments: