Friday, February 13, 2009

भांडण

एका जोडप्याची रोज भांडण होत असतात.


एक दिवस वैतागून पत्नी म्हणते, "ते शेजारचे बघा. सारखा हसण्याचा आवाज येत असतो त्यांच्या घरातून. नाही तर आपण. शिका काही त्यांच्याकडून."

पती:"ठीक आहे. आपण त्याना विचारुया की त्यांची भांडण का होत नाहीत ते."

ते शेजारच्या घरात जातात. शेजारचे त्यांच स्वागत करतात आणि विचारतात कस काय येण केल म्हणून.

पती: "त्याच काय आहे की आमची रोज भांडण होतात. तुमच्या घरातून मात्र सारखे हसण्याचे आवाज़ येत असतात. हे कस काय जमत तुम्हा दोघांना? आम्हाला पण सांगा."

शेजारचे म्हणतात "त्याच अस आहे की आमची पण रोज भांडण होतात आणि मग माझी बायको मला हाताला येइल ती वस्तु फेकून मारते. तिचा नेम चुकला तर मी मोठयाने हसतो आणि नेम बरोबर बसला तर ती मोठयाने हसते. म्हणूनच आमच्या घरातून कायम हसण्याचे आवाज येत असतात."

No comments: