Tuesday, February 17, 2009

विद्या विनयेन शोभते

सुपे गुरुजी : गण्या, थांब तुझ्या पालकांनाच बोलावून लावतो कसा. अभ्यासात शून्य आणि मी इतका जीव तोडून शिकवतोय तर तुझं सगळं लक्ष खिडकीबाहेर. हे क
ाय चालायचं नाही. तुझ्यासारख्या मुलांच्या ठायी शिक्षक काय सांगतायत ते नम्रपणे ऐकून घ्यायची वृत्ती, शिकून घेण्याची आस असायला हवी. काय समजलास?

गण्या : माफ करा गुरुजी.

सुपे गुरुजी : अरे शिंचा, मी ओरडतो ते तुमच्या भल्यासाठीच ना? कायम लक्षात ठेव, 'विद्या विनयेन शोभते,' काय समजलास?

गण्या : समजलं गुरुजी!

सुपे गुरुजी : मला सांग बघू तू या शिक्षण संस्थेत कशासाठी येतोस बरं?

गण्या : विद्येसाठीच की!

सुपे गुरुजी : शाब्बास. मग मी शिकवत असताना बाहेर का बरं बघत होतास तू?

गण्या : गुरुजी विद्या अजून आली नाहीय शाळेत ना. म्हणून तिचीच वाट बघत होतो.

No comments: