वेडय़ांच्या इस्पितळातले डॉक्टर, पेशंट मंडळीत किती सुधारणा आहे, ते बघणार होते. पाणी नसलेल्या कोरडय़ा तलावात गाद्या टाकल्या होत्या. एकेका पेशंटला उडी मारायला डॉक्टर सांगत होते. सहापैकी पाचजणांनी उडय़ा मारल्या त्यांना डॉक्टरांनी अजून जरा उपचार हवेत म्हणून परत पाठविले.
एकच पेशंट उडी न मारता गप्प उभा राहिले. डॉक्टर म्हणाले, ‘वा! तुम्ही बरे झाला आहात. तुम्हाला उद्या घरी पाठवतो. पण मला फक्त इतकंच सांगा की तुम्ही तलावात उडी का मारली नाहीत?’ पेशंट म्हणाला, ‘‘उडी मारायला मी काय वेडा आहे का? मला पोहायला कुठं येतंय?’’
No comments:
Post a Comment