Monday, May 11, 2009

शास्त्रीय संगीत

मालिनीबाईंना शास्त्रीय संगीताची खूप म्हणजे खूप आवड. आणि त्यांचे पती विजयरावना फक्त बरोबर जाणे माहीत. एकदा दोघं संगीत मैफलीला गेलं. मालिनीबाईंचं लक्ष समोरच्या रांगेतल्या एका श्रोत्याकडे गेलं. तो चक्क झोप काढत होता. मालिनीबाईंना विजयरावना कोपरानं ढोसलं. अहो बघा. गाणं रंगात आलंय नि तो शहाणा झोपलाय.
विजयराव त्यांच्यावर जोरात खेकसले, ‘‘मूर्ख कुठची. मी काय झोपलेली माणसं पाहिली नाहीत? एवढय़ाशा कारणावरून माझी झोपमोड केलीस.

No comments: