‘‘हा किल्ला ३०७ वर्षांपूर्वीचा आहे.’’ ठाम आवाजात किल्ल्याकडे हात दाखवत गाईड पर्यटकांना म्हणाला.
‘‘अगदी बरोबर ३०७ र्वष कशावरून?’’ असा तिरकस प्रश्न पुणेरी पर्यटकांशिवाय कोण विचारणार!
‘‘मी पाच वर्षांपूर्वी येथे नोकरीस लागलो तेव्हा मला या किल्ल्याचे वय ३०२ र्वष सांगण्यात आले होते.’’
पुणेकर चुप्प.
या उलट हा किस्सा-
‘‘हा महाल ३१५ वर्षांपूर्वीचा आहे.’’ गाईड
‘‘अहो चार वर्षांपूर्वी तुम्ही आम्हाला ३१५ चा आकडा सांगितला होता-’’ एक दुसऱ्यांदा त्या स्थळी आलेला शंकेखोर पर्यटक बोललाच.
‘‘मी येथे आहे तोपर्यंत हाच आकडा राहणार. कोणाची बदलायची हिंमत नाही!’’ गाईड.
’ गोव्यात मांडवी नदीतून चाललेली सफर. पाण्याच्या लाटांबरोबर गाईडची टकळी चालू. ‘‘नाऊ, माय फ्रेंडस्- तुम्ही आता कोठलाही गुन्हा करा, चोरी करा, पाकीट मारा.’’ गाईड.
‘‘आँ-’’ पर्यटक अचंबित.
‘‘तो बोर्ड बघा- वेलकम टु अग्वाद जेल’’- गाईडचा मिश्कील आवाज.
No comments:
Post a Comment