Thursday, May 7, 2009

सेलिब्रेट

समोरच्या कारची धडक बसल्याने संतापलेले पाटीलसाहेब आपल्या कारमधून उतरून त्याला जाब विचारायला धावले. धडक देणारा पटेल दोन्ही गाडय़ांचं झालेलं नुकसान पाहत शांतपणे म्हणाला, ‘‘माय मिस्टेक. मी तुम्हाला २५०० रुपये देतो. लगेच मिटवून टाकू.’’ कंपनीचीच कार वापरणारे पाटील मनातून खूश झाले. पटेल पुढे बोलला, ‘‘चला मला गाडी बदलायचीच होती. तुमच्यामुळे निमित्त मिळालं. आपण हे सेलिब्रेट करू.’’ पटेलने आपल्या गाडीतून व्हिस्कीची बाटली अन् दोन ग्लास काढले. पाटीलसाहेबांनी आनंदाच्या भरात उभ्या उभ्या तीन पेग घेतलेसुद्धा. अन् एकदम वरमून पटेलला म्हणाले, ‘‘अरे, मी एकटाच घेतोय. तुम्ही का घेत नाही?’’ पटेलने ती बाटली अन् ग्लास पाटीलसाहेबांच्या हातून घेऊन त्यांच्याच गाडीत ठेवले. अन् उद्गारला, ‘‘आता वाहतूक पोलीस येऊ दे, चौकीवर तपासणी होऊ द्या कोण प्यायलं त्याची. त्यानंतर घरी जाऊन घेईन की मी आरामात.’’

No comments: