Wednesday, April 1, 2009

भूगोल

गुळमुळे गुरुजी : बंड्या आज भूगोल शिकूया बरे.


बंड्या : गुरुजी भूगोल मला भारी आवडतो. तो एकदम सोप्पा विषय ऑ.

गुळमुळे गुरुजी : अशे... बरे बरे तर सांग पाहू, आपल्या पृथ्वीचा आकार कोणता आहे.

बंड्या : सोप्पाय की, चौकोनी.

गुळमुळे गुरुजी : शिंच्या, मेल्या भूगोल सोप्पा म्हणतोस आणि पृथ्वीला चौकोन म्हणतोस? अरे गोल की रे ती.

बंड्या : नाही हो गुरुजी. तुम्हीच परवा शिकवलंत ना. कोलंबस पृथ्वीच्या चारही कोपऱ्यात फिरून आला म्हणून. मग..??

No comments: