बापूरावचं निधन झालं. त्यानंतर चार वर्षांनी त्यांची पत्नी राधिकाही मृत्यू पावली. यमराज्यात गेल्या गेल्या राधिका म्हणाली, ‘अहो, बापूरावांशी माझी गाठ घालून द्या.’ यमराज म्हणाले! अहो, इथं पाच-दहा हजार, बापूराव असतील. तुमचा नवरा कसा ओळखायचा? काही खूण वगैरे सांगा. राधिकेला काही आठवेना. मग ती म्हणाली, ते म्हणाले होते, माझ्यापश्चात तुझं पाऊल वाकडं पडलं तर मला अजिबात झोप लागायची नाही. हे ऐकून यम म्हणाला, ‘‘जा रे बापू पाटलांना घेऊन या, गेली चार वर्षे बिचारा झोपलाच नाही.’’
No comments:
Post a Comment