Thursday, April 9, 2009

१० वर्षं

अशोक, बबन आणि किरण या तिघांना घरफोडी करत असताना पकडले जाते. तिघांनाही १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात येते. मात्र, तिघांचाही हा पहिलाच गुन्हा आहे हे लक्षात घेऊन त्यांच्या आवडीची कोणतीही एक वस्तू तुरुंगात नेण्याची परवानगी देण्यात येते. अशोक १० वर्षे पुरतील एवढी पुस्तके तुरुंगात घेऊन जातो. बबन असतो पक्का दारुडा. तो १० वर्षे पुरतील एवढय़ा व्हिस्कीच्या बाटल्या आत घेऊन जातो. किरण असतो चेनस्मोकर. तो १० वर्षांचा सिगारेटचा साठा आत घेऊन जातो.
१० वर्षांनी तिघांची तुरुंगातून सुटका होते. अशोक वाचलेल्या पुस्तकांतील सुविचार, कविता इ. मोठय़ाने म्हणत बाहेर येतो. पिऊन ‘टाइट’ असलेला बबन अडखळत बाहेर येतो. किरण दाराबाहेर आपले डोके काढून विचारतो, ‘‘कुणाकडे माचिस आहे का माचिस?’’

No comments: