Monday, April 20, 2009

वेषभूषास्पर्धेसाठी

एक शिक्षिका वर्गातल्या एका गुबगुबीत मुलाला वेषभूषास्पर्धेसाठी `गणपती' बनवू पहात होती. पण त्या शिक्षिकेनं, त्याचप्रमाणे त्या मुलाच्या आईनंही त्याचं मन वळविण्याचा बराच प्रयत्न करूनहीम, तो त्यांचं ऐकेना.
अखेर त्याला एका बाजूला घेऊन आई म्हणाली, "गुंड्या, अरे यापूर्वी तू बऱ्याच वेळा मोठ्या उत्साहानं भाग घेऊनम अनेक वेषभूषास्पर्धेत बक्षिसे मिळविलीस; मग याच वेळी तू `गणपती' का होत नाहीस ? अरे, लोक तुझी पुजा करतील, तुला मोदक देतील, तुझी आरती करतील! केवढी मज्जा येईल ठाऊक आहे?
यावर गुंड्या म्हणाला, "ते सगळ खरं गं ? पण शेवटी `पुढच्या वर्षी लवकर या' असं म्हणून जर त्यांनी मला नदीत बुडवलं, तर काय करायचं ?

No comments: