Monday, November 16, 2009

‘टीचर्स डे’

शाळेत ‘टीचर्स डे’ साजरा केला जात होता. विनायक नावाच्या एका विद्यार्थ्यांने भागवत सरांची भूमिका करावयाचे ठरविले. बराचसा पाठांतर केलेला विषय अगदी तालात येऊन तो शिकवित होता. गुरुजी अगदी पाठी असलेल्या बेंचवर बसून पाहत होते.
एका हुशार विद्यार्थ्यांने मध्येच एक मोठी शंका विचारली. विनायक गडबडला.. पण लगेच स्वत:ला सावरून त्याने म्हटले, अरे ही काय शंका आहे? याचे उत्तर मागे बसलेलं ‘सर’सुद्धा देतील!’’

No comments: