Wednesday, November 4, 2009

मोठा फोटो

एका शिक्षणशास्त्र महाविद्यालयात नवीनच रुजू झालेल्या प्राचार्यानी ग्रंथालयाची पाहणी केली आणि ग्रंथपालास सुचविले. ‘सर, सर्व भिंती कशा रिकाम्या वाटतात! एक काम करा! त्यावर एखादा मोठा फोटो लावा!’ नवनियुक्त ग्रंथपाल कमलाकर गोंधळे म्हणाले, ‘अं.. घरी शोधतो सर.. नसेल तर काढून घेतो!’ यावर प्राचार्याचा प्रचंड भडका उडाला, ते उद्वेगाने म्हणाले, ‘अहो! तुमचा नाही. ज्याने लायब्ररी सेटअप केली, अशा माणसाचा फोटो लावा.’ गोंधळलेल्या गोंधळे चाचरत बोलला, ‘पण.. सर! लायब्ररी तर काल दुपारी मीच सेटअप केली!’

No comments: