एक सरकारी कर्मचारी होता. त्याचे नशीब उघडले. त्याच्या हाती एक जुना दिवा लागला. तो घासताच त्यामधून जिन्न निघाला गडगडाट करत तो म्हणाला, ‘‘कुठल्याही तीन गोष्टी मागा.’’
‘‘मला थंडगार बिअर हवी,’’ कर्मचारी म्हणाला.
‘‘ढुक’’ जिन्नने हात फिरवताच बिअर आली.
‘‘आता असे बेट हवे ज्यावर माझा बंगला, मी अन् सुंदर तरुणींचा ताफा हवा.’’
‘‘ढुक!’’ अन् सारे तयार.
‘‘आता मला काहीच काम करावे लागायला नको.’’
‘‘ढुक!’’ अन् तो सरकारी कर्मचारी परत त्याच्याच कार्यालयात होता.
No comments:
Post a Comment